शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम खात्याला अडीच वर्षानंतर सचिव मिळाला

By admin | Updated: June 4, 2014 01:04 IST

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला तब्बल अडीच वर्षानंतर सचिव लाभला आहे. डझनावर न्यायालयीन अडथळे पार केल्यानंतर मंगळवारी अखेर व्ही.आर.नाईक यांची नियुक्ती करण्यात आली.

राजेश निस्ताने - यवतमाळराज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला तब्बल अडीच वर्षानंतर सचिव लाभला आहे. डझनावर न्यायालयीन अडथळे पार  केल्यानंतर मंगळवारी अखेर व्ही.आर.नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. धनंजय धवड सेवानवृत्त झाल्यापासून (अडीच वर्षे) बांधकाम खात्यातील (रस्ते) सचिवाचे पद रिक्त होते. सेवाज्येष्ठता आणि  आरक्षण बिंदूनुसार व्ही.आर.नाईक या पदासाठी पात्र असताना त्यांच्या नियुक्तीत अडचणी निर्माण केल्या गेल्या. त्यासाठी मुंबई  औरंगाबाद उच्च न्यायालय, मुंबई ‘मॅट’ (महाराष्ट्र प्रशासकीय लवाद) येथे ८ ते १0 वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात  आल्या. या सर्व याचिकांचे निकाल अंतत: नाईक यांच्या बाजूने लागले. अखेर मंगळवारी मुंबईच्या विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य  अभियंता नाईक यांच्या बढतीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली. ते रस्ते विभागाचे सचिव म्हणून पुढील साडेपाच वर्ष  राहणार आहे. नाईक यांच्या या नियुक्तीवर मुंबईतील मुख्य अभियंता तामसेकर यांचा आक्षेप आहे. शासनाने मुख्य अभियंत्यांची ज्येष्ठता यादी  लावली नाही, जी लावली ती चुकीची लावल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र मुळात स्वत: तामसेकर यांच्याकडे सहा ते आठ महिने  सचिवाचा अतिरिक्त प्रभार असताना त्या काळात त्यांनी ही ज्येष्ठता यादी का लावली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात सचिवाचेपद रिक्त असताना तीन वर्षांपूर्वी धनंजय धवड यांना अतिरिक्त प्रभार देण्याचा प्रयत्न  झाला. मात्र त्यावेळी काही मुख्य अभियंत्यांनी बांधकाम मंत्र्यांना भेटून या प्रभाराला विरोध केला होता. त्यानंतर सेवा ज्येष्ठ  असलेल्या धनंजय धवड यांना डावलून कनिष्ठ असलेल्या मुख्य अभियंता तामसेकर यांच्याकडे हा प्रभार दिला गेला होता.