मुंबई - अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा राजकीय वर्तुळात वेगाने चर्चेत आला. अपघातापूर्वी अजित पवार आणि शरद पवार गटातील नेते जयंत पाटील यांच्यात बऱ्याच बैठका झाल्या होत्या. याच बैठकातून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याशिवाय निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती. १२ फेब्रुवारी ही तारीखही ठरण्यात आली होती असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते करत होते. आता त्यातच आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर विचारलेल्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, मला विलीनीकरणावर बोलायचं नव्हते. पण जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि अजितदादांची इच्छा दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची होती. भावनिक दृष्टीने ते विचार करत होते. राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते तर महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद डॉ. अमोल कोल्हे यांना देण्यात आले असते. दुसऱ्या गटातील लोकांना विलीनीकरणावर बोलायला भारी वाटते. त्यांच्या पत्रकार परिषद पाहिल्या तर त्यांना विलीनीकरणावर बोलायला फार आवडते. आम्हीच अजितदादांचा अपघात की घातपात या विषयावर बोलतोय. त्यामुळे त्यांना ज्या विषयावर बोलायचे आहे त्यावर मी आज बोलले पाहिजे असं वाटत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच डॉ. अमोल कोल्हे हे संयुक्तिक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले असते, ती अजितदादांची इच्छा होती. अजितदादांच्या इच्छेप्रमाणे अमोल कोल्हे फार प्रामुख्याने पुढाकार घेत होते. अजितदादांना पक्ष वाढवायचा होता. अमोल कोल्हे यांनीही विलीनीकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे बोललेत. ज्यांच्या घरी बैठका झाल्या ते जयंत पाटील बोललेत. १३ बैठका झाल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेज कुठून घ्यायचे हे सगळ्यांना माहिती आहे. मंत्री लोढा यांच्या घरासमोरचा सीसीटीव्ही बघा, दादा वेगवेगळ्या वाहनातून तिथे आले होते. जयंत पाटील यांनीही स्पष्टीकरण दिले आहे असं रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
दरम्यान, सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्यात असं नाही. ३५ आमदारांनी सह्या केल्यात. त्या ३५ आमदारांपैकी एखाद्याला विचारले तरी ते विलीनीकरणाबाबत स्पष्ट सांगतील. सर्वच पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्या नाहीत. सुनेत्रा पवारांसाठी बहुमताने पदाधिऱ्यांनी सह्या केल्या. त्यामुळे ज्यांनी सह्या केल्या नाहीत ते आमदार कोण, ते पदाधिकारी कोण हा संशोधनाचा विषय आहे असा रोहित पवारांनी टोला लगावला आहे.
Web Summary : Rohit Pawar claims Ajit Pawar desired Amol Kolhe as NCP state president after the merger, with preparations underway. Meetings occurred, aiming for joint elections and a February 12th merger announcement. Some MLAs didn't support Sunetra Pawar's national president bid.
Web Summary : रोहित पवार का दावा है कि अजित पवार विलय के बाद अमोल कोल्हे को एनसीपी प्रदेश अध्यक्ष बनाना चाहते थे, जिसके लिए तैयारियां चल रही थीं। संयुक्त चुनाव और 12 फरवरी को विलय की घोषणा करने के उद्देश्य से बैठकें हुईं। कुछ विधायकों ने सुनेत्रा पवार की राष्ट्रीय अध्यक्ष पद की बोली का समर्थन नहीं किया।