शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे ?, अजित पवारांची सावध प्रतिक्रिया

By admin | Updated: January 25, 2017 23:29 IST

शरद पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार ?

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - शरद पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार ? असा सवाल अजित पवारांना विचारला असता त्यांनी सावध प्रतिक्रिया घेतली आहे. पवार साहेबांच्या कार्यपद्धतीनुसार काम करणारी व्यक्ती, मग ती पवार आडनावाची असो किंवा सुळे अथवा दुस-या कुठल्याही आडनावाची व्यक्ती वारसदार होऊ शकेल, असं परखड मत अजित पवारांनी मांडलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मात्र अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या नंतर कोण?, याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार म्हणाले, पुण्यात आघाडीसाठी राष्ट्रवादी सकारात्मक आहे पण आघाडी सन्मानपूर्वक व्हायला हवी. नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. नोटाबंदीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी केंद्र, राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. एखादी लाट कायमस्वरूपी राहत नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयला 50 दिवसांत 60 परिपत्रकं का काढावी लागली, असा सवाल उपस्थित करत त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे. शरद पवार यांचं काम मोलाचं आहे. त्यामुळे त्यांचा पद्मविभूषणाने सन्मान होणं हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे. जी व्यक्त श्रेष्ठ असते ती श्रेष्ठचं असते त्याची तुलना आमच्यासोबत होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले आहेत. आम्ही आमच्या परीने काम करत राहिलो. त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही सहा वेळा आमदार होऊ शकलो, असंही अजित पवार म्हणाले.