शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:46 IST

मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या जीआरला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. त्यात ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी महायुती सरकारने उपसमिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारने उपसमितीची गठीत केली होती. या उपसमितीचे अध्यक्षपद मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले. त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर सरकारने जीआर काढले आहेत. त्यामुळे ओबीसी समाजात नाराजी पसरली आहे. आता ओबीसी समाजासाठीही मंत्रिमंडळाने उपसमिती स्थापन करण्याला मान्यता दिली आहे.

मागील अनेक दिवसांपासून ओबीसी समाजासाठी उपसमितीची स्थापना करावी असा प्रस्ताव होता, २-३ कॅबिनेटमध्येही हा प्रस्ताव आला परंतु आज ३ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींसाठी उपसमिती गठित करण्याला मंजुरी दिली. या समितीत महायुती सरकारमधील प्रत्येक पक्षातील २ सदस्य असतील अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

तसेच ओबीसी समाजाच्या मागण्या असतील, त्यांच्या समस्या आणि काही उणीवा असतील, त्यांचे प्रश्न असतील त्याच्या सोडवणुकीसाठी ओबीसी उपसमिती काम करेल. जशी मराठा समाजासाठी उपसमिती होती, तशीच ओबीसी उपसमिती होती. छगन भुजबळ हे जुने जाणते नेते आहेत, त्यांची काही नाराजी असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते दूर करतील असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारने बेकायदेशीर शासन निर्णय काढला असून नातेसंबधांतील, कुळातील माणसाने प्रतिज्ञापत्र दिल्यास त्याला कुणबी प्रमाणपत्र देऊ असं निर्णयात म्हटलं आहे. आम्ही याविरोधात कोर्टात जाणार आहोत. या निर्णयाविरोधात हजारो याचिका दाखल होतील. या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर राजकारण, नोकरी आणि शिक्षणातील सर्व प्रतिनिधित्व संपणार आहे. मग ओबीसींनी कुणाकडे पाहायचे, आम्हाला पिढीजात व्यवसाय करावे लागतील. जरांगेंच्या बेकायदेशीर मागणीला त्यांच्या समाजातील आमदार, मंत्र्‍यांनी रेड कार्पेट टाकले तसे ओबीसी आमदार, खासदार, मंत्री मूग गिळून गप्प का बसलेत, ओबीसींचा फायदा होणार की नुकसान होणार हे स्पष्ट करावे. छगन भुजबळ वगळता इतर ओबीसी नेत्यांनी यावर भूमिका मांडावी अशी मागणी ओबीसी नेते मनोज ससाणे यांनी केली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीGulabrao Patilगुलाबराव पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील