शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

जादा मुद्रांक शुल्क, दुप्पट विकास शुल्क

By admin | Updated: August 1, 2015 01:02 IST

मेट्रो, मोनो रेल्वेसह सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था निर्माण करण्याचा खर्च मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढ करीत सामान्यांच्या खिश्यातून काढण्याची मूभा महापालिका वा स्थानिक

- यदु जोशी, मुंबई

मेट्रो, मोनो रेल्वेसह सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था निर्माण करण्याचा खर्च मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढ करीत सामान्यांच्या खिश्यातून काढण्याची मूभा महापालिका वा स्थानिक प्राधिकरणांना देण्यात आली आहे. त्याचवेळी या ठिकाणी विकास शुल्क दुप्पट करून सरकारने आणखी एक दणका दिला आहे. मुद्रांक शुल्क १० टक्क्यांपर्यंत गेल्याची ओरड झाल्यानंतर तत्कालिन आघाडी सरकारने २००२ मध्ये हे शुल्क ४ टक्क्यांपर्यंत खाली आणले होते. त्यानंतरच्या काळात त्यात हळूहळू वाढ होत गेली आणि ते सात टक्क्यांवर गेले. आता नागरी परिवहन प्रकल्प होत असलेल्या वा होणार असलेल्या शहरांमध्ये मुद्रांक शुल्कात आणखी एक टक्का वाढ करण्याची अनुमती देणारे विधेयक विधानसभेत आज गदारोळात मंजूर करण्यात आले. स्थावर मालमत्तेची विक्री, दान आणि गहाण या व्यवहारांवर हे जादाचे एक टक्का मुद्रांक शुल्क आकारता येणार आहे. सूत्रांनी सांगितले की सामान्यांवर बोजा टाकणारा हा निर्णय घेऊ नये, असे मत नगरविकास विभागाने व्यक्त केले होते पण ते बेदखल करीत सरकारने वाढीचा निर्णय घेतला. पायाभूत सुविधांचा विचार करता मेट्रो, नागरी परिवहन प्रकल्प, मुक्त मार्ग, सागरी सेतू हे आज परवलीचे शब्द बनले आहेत. त्यांच्या उभारणीने विकासाचे नवे पर्व येईल, असा दावा केला जात असतानाच त्यासाठी नागरिकांवर आर्थिक बोजा पडणार असल्याचे आज मंजूर झालेल्या विधेयकावरून स्पष्ट झाले आहे. नागरी वाहतूक प्रकल्प होणार असलेल्या शहरांमध्ये विकास शुल्क दुप्पट करण्याची तरतूद असलेले महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या कलम १२४ मध्ये सुधारणा करणारे विधेयकही मंजूर झाले. जमीन विकासापोटी वार्षिक दर तक्त्याच्या ०.५ टक्के शुल्क आकारले जाते. तर, बांधकामासाठी एएसआरच्या २ टक्के शुल्क आकारले जाते. दोन्हींमिळून २ टक्के शुल्क आकारण्यात येत होते. आता ते १ टक्का आणि ४ टक्के असे मिळून ५ टक्के आकारले जाईल. मोदींच्या स्वप्नाचे काय?विकास शुल्कात केलेली दुप्पट वाढ आणि स्थावर मालमत्ता विक्रीवर एक टक्का जादा मुद्रांक शुल्क आकारण्याच्या निर्णयाचा फटका सामान्यांना आणि विशेषत: गृहनिर्माण क्षेत्राला बसेल. सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितले आहे. त्याला छेद देणारे हे दोन्ही निर्णय असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यांना प्रिमियम का नाही? प्रादेशिक योजनेंतर्गत येणाऱ्या जमिनींसाठी औद्योगिक ते रहिवासी असा वापरात बदल करायचा असल्यास २० टक्के प्रिमियम आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वास्तविक पाहता अनेक महापालिकांच्या क्षेत्रामध्ये सरकारने पूर्वीपासून बड्या उद्योगांना जमिनी नाममात्र दराने वाटप केलेल्या आहेत. अशा जमिनींचा वापर अनेक ठिकाणी मॉल्स, गगनचुंबी इमारतींसाठी झाला आहे. आतापर्यंत त्यासाठी प्रिमियम आकारला नाही. यापुढे असा वापर बदलल्यास शासनाने प्रिमियत आकारला तर कोट्यवधींचे उत्पन्न सरकारला मिळेल पण त्याकडे डोळेझाक केली जात आहे.