शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

मनसे आंदोलनाचे तीव्र पडसाद

By admin | Updated: September 15, 2016 03:54 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुंबईतील पत्रपरिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाचे बुधवारी नागपुरात पडसाद उमटले

नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुंबईतील पत्रपरिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाचे बुधवारी नागपुरात पडसाद उमटले. संतप्त विदर्भवाद्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘पोस्टर्स’ जाळली. स्वतंत्र विदर्भाचा लढा आणखी तीव्र करण्यात येईल, असा निर्धार या वेळी विदर्भवाद्यांनी व्यक्त केला.प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पत्रकार परिषदेत मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोंधळ घातला. या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी कोअर कमिटी सदस्य अ‍ॅड. वामनराव चटप यांना धक्काबुक्की केली होती. याच्या निषेधार्थ समितीचे कार्यकर्ते सकाळी नागपुरातील व्हेरायटी चौकात एकत्र आले. या वेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. बाळासाहेब ठाकरे, राज व उद्धव ठाकरे यांची ‘पोस्टर्स’ जाळण्यात आली. तसेच राज ठाकरे यांचा पुतळादेखील जाळण्यात आला.या वेळी माजी खासदार व ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे, अ‍ॅड. नंदा पराते व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. भंडारा येथेही राज ठाकरे यांचा पुतळा जाळण्यात आला. (प्रतिनिधी)ही मुंबई नव्हे, विदर्भभूमी आहेमनसे, शिवसेना यांचे अस्तित्व मुंबईपुरतेच मर्यादित आहे. मुंबई म्हणजे संपूर्ण राज्य होत नाही. जनतेच्या भावनांचा मनसे किंवा इतर कुठलाही पक्ष अपमान करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा या वेळी विदर्भवाद्यांनी दिला.राज ठाकरे यांना आव्हानवेगळ्या विदर्भाला सामान्य लोकांचा विरोध आहे, असा समज मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा असल्यास त्यांनी माझ्या काटोल मतदारसंघातून निवडणूक लढवावी व निवडून यावे, असे आव्हान काटोलचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी दिले आहे.आ. देशमुख यांनी दिलेले निवडणुकीचे आव्हान मनसेचे प्रशांत पवार यांनी स्वीकारले आहे. आ. देशमुख यांच्याविरोधात लढण्यासाठी राज ठाकरे यांची गरज नाही. त्यांचे कार्यकर्तेच सक्षम आहेत, देशमुख यांनी राजीनामा द्यावा, मी त्यांच्याविरुद्ध लढतो, असे प्रशांत पवार यांनी स्पष्ट केले.मनसेने जाळला विदर्भाचा झेंडा : विदर्भवाद्यांच्या आंदोलनानंतर मनसे कार्यकर्त्यांनीही दुपारी व्हेरायटी चौकातच ‘विदर्भवादी मुर्दाबाद’च्या घोषणा देत विदर्भवाद्यांचा झेंडा जाळला. अखंड महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्या विदर्भवाद्यांना यापुढे मनसेतर्फे जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा पक्षाचे विदर्भ संघटक हेमंत गडकरी यांनी दिला.