शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री सुश्मिता सेनला पालिकेची नोटीस

By admin | Updated: September 26, 2016 19:48 IST

अभिनेता शाहीद कपूरपाठोपाठ आता प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या खार येथील निवासस्थानी डासांच्या उत्पत्तीस्थान आढळून आले

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 26 - अभिनेता शाहीद कपूरपाठोपाठ आता प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या खार येथील निवासस्थानी डासांच्या उत्पत्तीस्थान आढळून आले आहे. सेन यांनी विविध कारणे देऊन आठ दिवस पालिका कर्मचाऱ्यांना घरात तपासणीसाठी प्रवेश दिला नव्हता. अखेर शुक्रवारी ही पाहणी करुन तिला नोटीस बजावली असून सेनवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. दोन आठवड्यांपूर्वी विद्या बालन हिला डेंग्युची लागण झाल्यानंतर पालिकेने खार येथील तिच्या निवासस्थानी पाहणी केली होती. त्यावेळीस त्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या शाहीद कपूरच्या घरातही डासांच्या उत्पतीचे स्थान सापडले होते. त्यानंतर पालिकेने नुकतीच अभिनेत्री सुश्मिता सेनच्या घराचीही पाहणी केली. खार येथील आंबेडकर मार्गावरील सद्गुरु सुंदरी को.आॅप.सो. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर सेन राहते. या इमारतीमध्ये डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्यासाठी पालिका पाहणी करीत आहे. मात्र सेनने पालिका कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारला होता. अखेर शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी तिच्या घराची पाहणी केल्यानंतर तीन ठिकाणी असलेली डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली. या प्रकरणी सेनला पालिकेने ३८१ बी अंतर्गत नोटीस बजावली आहे. त्यानुसार तिला दोन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. या वृत्तास कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रीकर यांनी दुजोरा दिला आहे. प्रतिनिधी चौकट या तीन ठिकाणी डासांच्या अळ्या गच्चीवरील ताडपत्रींमध्ये साठलेल्या पाण्यात, भंगार सामान आणि गॅलेरीमध्ये साठलेल्या पावसाच्या पाण्यात एडिस डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. सनदी अधिकाऱ्यांना पालिकेचे अभय मंत्रालयानजिक असलेल्या यशोधन इमारतीमध्ये राहणाऱ्या पाच सनदी अधिकाऱ्यांच्या घरामध्ये एडीस डासांची उत्पत्ती आढळून आली होती. मात्र सर्वसामान्य नागरिकांना तात्काळ नोटीस बजाविणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांनी येथील एकाही सनदी अधिकाऱ्याला नोटीस बजावली नाही. या अधिकाऱ्यांनी स्वत:च पाहणीसाठी बोलाविल्याने नोटीस पाठविण्याची गरज नाही, असा बचाव अधिकारी करीत आहेत.