शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या २४ बसवर आरटीओची कारवाई

By admin | Updated: June 5, 2014 22:31 IST

रस्त्यावर उतरणा-या बसची संख्या कमी असल्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक पीएमपीला करावी लागत आहे.

मे महिना : ओव्हरलोड प्रवासी ठरले डोकेदुखी पुणे : रस्त्यावर उतरणा-या बसची संख्या कमी असल्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक पीएमपीला करावी लागत आहे. परंतु या बस प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असल्याने आरटीओतर्फे कारवाई करण्यास सुरुवात झाली. मे महिन्यात २४ पीएमपीवर कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशा ओव्हरलोड बसवर दिसल्यास कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.ओव्हरलोड प्रवाशांची वाहतूक करणे धोकादायक आहे. मुळात पीएमपीएलच्या ताफ्यात बसेसची संख्या कमी असल्याने, सर्वच मार्गावर बसची संख्या तसेच फेर्‍या कमी पडत आहेत. त्यामुळे कंडक्टर आणि ड्रायव्हर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये घेतात. त्यामुळेच बस ओव्हरलोड होते. सद्यस्थितीत पीएमपीएलकडे १२६७ बसेस आहेत. तर ठेकेदारांच्या ६८२ बसेस आहेत. ज्या बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. त्याकडून दंड वसूलीचे काम सुरु असल्याचेही पाटील यांनी सांगितले.क्षमतेपेक्षा अधिकच्या प्रवाशांची पीएमपीएलने वाहतूक करु नये, अशी सुचना आरटीओच्या वतीने पीएमपीएलला देण्यात आली होती. मात्र सुचनेला केराची टोपली दाखवित अधिकच्या प्रवाशंाची वाहतूक सुरुच ठेवली आहे. दुदैवाने ओव्हरलोड बसला एखाद्या वेळी अपघात झाल्यास प्रवाशांना अधिक धोका असतो. मागच्या आणि पुढच्या दारात प्रवासी लोबकाळत असतात. त्यामुळे बसच्या बाजूने कोणते वाहन येत आहे, हे चालकाला कळतच नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून पीएमपीएलच्या अपघातात वाढ झाली आहे.'पीएमपीवर होणा-या कारवाईतून धडा घेणे गरजेची आहे. प्रवाशांना चांगली सेवा तसेच सुरक्षित प्रवास देण्यासाठी आम्ही क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसमध्ये न घेण्याचा प्रयत्न करु. तसेच वाहतूकीचे सर्वच नियम पाळण्याचा प्रयत्न करु.'-प्रशांत जगताप, संचालक, पीएमपीएल.