शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील फेरीवाल्यांवर कारवाई

By admin | Updated: April 4, 2017 03:39 IST

शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने पुन्हा धडक कारवाई सुरू केली

नवी मुंबई : शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने पुन्हा धडक कारवाई सुरू केली आहे. एकाच दिवसामध्ये तब्बल ९०० फेरीवाले हटविण्यात आले असून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथ, रस्त्यांवर अतिक्रमण करण्यास सुरवात केली होती. याविषयीचे वृत्त लोकमतने ३ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर पालिका प्रशासनाने बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा या आठही प्रभागांमध्ये एकाच वेळी मोहीम राबविण्यात आली. रोड, पदपथ, रहदारीला अडथळा होईल अशा ठिकाणी बसलेल्या फेरीवाल्यांना हटविण्यात आले. रसवंतीगृह, खाद्यपदार्थ विक्री व बनविणारे, हॉटेलसह इतर दुकानांच्या बाहेर ठेवलेले साहित्यही जप्त केले आहे. पुन्हा फेरीवाल्यांनी अतिक्रमण करू नये यासाठी त्यांचे सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून ते कोपरखैरणेमधील जुन्या क्षेपणभूमीवरील गोडावूनवर ठेवण्यात आले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, अतिक्रमण उपआयुक्त अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरात कुठेही अनधिकृतरीत्या व्यवसाय होत असेल व फेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास होत असेल तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्यांनाही हटविण्यात येणार असल्याचे सर्व विभाग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शहरात एकाच दिवशी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहे.