सीताबर्डी ठाण्यात आरोपीची आत्महत्या

By Admin | Updated: June 5, 2016 02:43 IST2016-06-05T02:43:11+5:302016-06-05T02:43:11+5:30

सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या कस्टडीत शनिवारी मध्यरात्री एका आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली. राकेश शेषराव मेंढे, असे मृतकाचे नाव आहे. तो धम्म नगरात राहात होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

The accused suits in Sitabuldi Thane | सीताबर्डी ठाण्यात आरोपीची आत्महत्या

सीताबर्डी ठाण्यात आरोपीची आत्महत्या

नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या कस्टडीत शनिवारी मध्यरात्री एका आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली.
राकेश शेषराव मेंढे, असे मृतकाचे नाव आहे. तो धम्म नगरात राहात होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. शनिवारी मध्यरात्री नंतर राकेशला सीताबर्डी पोलिसांनी बॅग चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू असताना त्याने बाथरुमला जायचे आहे, असे म्हटले. पोलीस ठाण्याच्या आतच बाथरुम असल्याने पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. बराच वेळ होऊनही तो बाथरूम मधून बाहेर न आल्यामुळे पोलीस दार ठोठावू लागले. मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी दार तोडले असता राकेश आतमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. त्याने स्वत:च्या शर्टने गळफास लावला होता. या घटनेमुळे पोलिसांची भंबेरी उडाली. वरिष्ठांना माहिती मिळताच सह पोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी सीताबर्डी ठाण्यात पोहोचले. या घटनेच्या पार्श्वभूमिवर सीताबर्डी ठाण्यातील काही पोलिसांवर निलंबनाचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.

 

Web Title: The accused suits in Sitabuldi Thane