शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

प्रेतासोबत सेक्स करणारा आरोपी रिमांड होममधून पळाला

By admin | Updated: October 7, 2016 10:31 IST

कल्याण येथील एका तरुणीच्या हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी भिवंडी रिमांड होममधून सोमवारी पळून जाण्यात यशस्वी ठरला.

 ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. ७ - कल्याण येथील एका तरुणीच्या हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी भिवंडी रिमांड होममधून सोमवारी पळून जाण्यात यशस्वी ठरला. हा अल्पवयीन आरोपी साधासुधा नसून त्याच्यावर दोन हत्या, दोन हत्यांचे प्रयत्न आणि अनेक दरोडयाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यासह अन्य दोन कैदीही पळून गेले. 
 
ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीला पकडण्यासाठी तीन टीम्स बनवल्या आहेत. पळून गेलेला अल्पवयीन आरोपी घरफोडी करणा-या टोळीमध्ये होता. एप्रिल महिन्यात या टोळीने कल्याणमधील एका गृहनिर्माण सोसायटीच्या तिस-या मजल्याच्या फ्लॅटमध्ये घरफोडी केली. 
 
२२ वर्षीय तरुणी रात्रीच्यावेळी घरात एकटी असताना ही टोळी घरामध्ये घुसली. त्यांच्या हालचालीने तरुणीला जाग आली. तिने आरडाओरडा करण्याआधीच अल्पवयीन आरोपीने तिच्या डोक्यात तलावारीने आघात केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. 
त्यानंतर तिथून निसटण्यापूर्वी या अल्पवयीन आरोपीने तरुणीच्या मृतदेहासोबत लैंगिक चाळे केले.
 
मॅकेनिकल इंजिनीयर असलेल्या या तरुणीला पोलिस अधिकारी व्हायचे होते. ती एमपीएससीची परिक्षाही पास झाली होती. पोलिसांनी या आरोपीविरोधात प्रौढासाठी असणा-या कायद्याखाली खटला चालवण्याची मागणी केली होती. पणे ज्युवेनाईल जस्टीस बोर्डाने त्यांची मागणी फेटाळून लावली व आरोपीला रिमांड होममध्ये पाठवले.