शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
3
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
4
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
5
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
6
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
7
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
8
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
9
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
10
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
11
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 06:41 IST

Maharashtra Education Policy: शिक्षणधोरण २०२० नुसार बदलांची सुरुवात; २०२८-२९ पर्यंत अभ्यासक्रम पूर्णपणे लागू होणार

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यात नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५-२६ पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात १४ जुलैला शासन निर्णय जारी करत हा अभ्यासक्रम ५- ३- ३- ४ या नव्या आकृतीबंधावर आधारित असून, तो टप्प्याटप्प्याने सर्व शाळांमध्ये लागू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

नव्या धोरणानुसार, पारंपरिक १०-२ प्रणालीऐवजी बालवाडी ते पदवीपर्यंत शिक्षणाची अखंड साखळी तयार केली आहे. बालवयातील शिक्षण, मूल्यमापन, पाठ्यपुस्तक निर्मिती आणि शिक्षक प्रशिक्षण या सर्व पातळ्यांवर अभ्यासक्रमात बदल होणार आहे. इयत्ता पहिलीसाठी २०२५-२६, इयत्ता दुसरी ते सहावी २०२६-२७मध्ये, तर बारावीपर्यंत २०२८-२९ पर्यंत हा अभ्यासक्रम पूर्णपणे लागू होईल.

नवीन अभ्यासक्रमात अनुभवाधारित, आनंददायक, समावेशी आणि मूल्याधारित शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. संख्याज्ञान, भाषा, तार्किक विचार, जीवनकौशल्ये, सर्जनशीलता आणि स्थानिक गरजांनुसार विषयवस्तू समाविष्ट केली जाणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व बालभारतीमार्फत पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या   निर्देशानुसार केंद्रस्तरीय अभ्यासक्रमाचा राज्याभिमुख वापर होणार आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण, समग्र मूल्यांकन पत्रक, सेतू अभ्यासक्रम तसेच शालेय वेळापत्रक व सत्र प्रणालीत बदल केले जातील. 

नवा आकृतीबंध असा...पायाभूत स्तर      वय वर्षे ३ ते ८      बालवाडी १, २, ३ व इयत्ता पहिली व दुसरीपूर्वतयारी स्तर      वय वर्षे ८ ते ११      तिसरी, चौथी, पाचवीपूर्व माध्यमिक स्तर      वय वर्षे ११ ते १४      सहावी ते आठवीमाध्यमिक स्तर      वय वर्षे १४ ते १८      नववी ते बारावी

नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी (वर्षनिहाय) 

२०२८-२९  आठवी, दहावी, बारावी

२०२७-२८  पाचवी, सातवी, नववी, अकरावी

२०२६-२७दुसरी, तिसरी, चौथी, सहावी

२०२५-२६ इयत्ता पहिली

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र