Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:35 IST2025-12-06T12:33:13+5:302025-12-06T12:35:05+5:30
अयोध्या येथे दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव येथील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन एक महिला ठार झाली आणि १५ जण जखमी झाले.

Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव (जि. जळगाव) : अयोध्या येथे दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव येथील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन एक महिला ठार तर १५ जण जखमी झाले. ही घटना मगरगंजनजीक शनिवारी पहाटे साडेचार वाजता घडली.
कल्याणे खुर्द ता. धरणगाव आणि कन्हेरे ता. अमळनेर येथील काही भाविक आणि महिला रेल्वेने अयोध्याकडे रवाना झाले होते. सुलतानपूर येथे उतरून हे भाविक खाजगी वाहनाने अयोध्याकडे निघाले निघाले होते. वाटेत मगरगंजनजीक त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यात कल्पना शरद पाटील (वय ५४, रा.बिबा नगर जळगाव) ह्या ठार झाल्या.
जखमींमध्ये संजय प्रताप पाटील, भारत दगडू पाटील, साहेबराव पाटील , हरसिंग पाटील, दगडू धुडकू पाटील, सुमनबाई बुधा पाटील, सुमित्राबाई भारत पाटील, आशाबाई साहेबराव पाटील , नीताबाई महेंद्रसिंग पाटील , अर्चना सुधाकर पाटील, संगीता रवींद्र पाटील, रंजना विजू पाटील , इंदुबाई मधुकर पाटील, योजना पदम पाटील, आशाबाई बाळू पाटील आदींचा समावेश आहे. जखमींना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.