प्रियकर आणि पतीसोबत मिळून केली दुसऱ्या प्रियकराची हत्या, साताऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:42 IST2026-01-23T15:42:49+5:302026-01-23T15:42:53+5:30

Crime News: गेल्या काही काळापासून अनैतिक संबंधांचं आणि त्यामधून होणारे गुन्हेही वाढले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात घडली आहे.

A shocking incident in Satara, where a woman along with her lover and husband murdered another lover. | प्रियकर आणि पतीसोबत मिळून केली दुसऱ्या प्रियकराची हत्या, साताऱ्यातील धक्कादायक घटना

प्रियकर आणि पतीसोबत मिळून केली दुसऱ्या प्रियकराची हत्या, साताऱ्यातील धक्कादायक घटना

गेल्या काही काळापासून अनैतिक संबंधांचं आणि त्यामधून होणारे गुन्हेही वाढले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात घडली आहे. येथे एका तरुणाची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले होते. एका महिलेने तिचा पहिला प्रियकर आणि पतीसोबत मिळून तिचा दुसरा प्रियकर असलेल्या या २७ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

सतीश दादासाहेब गडस असे या मृत तरुणाचं नाव असून, तो फलटणमधील सोमंथळी गावातील रहिवासी होता. सतीश हा १४ जाानेवारी घरातून बाहेर पडल्यानंतर तो परत आलाच नाही. त्यामुळे चिंतीत झालेल्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला मात्र त्याचा काही ठावठिकाणा लागला नाही. अखेरीस त्याच्या भावाने पोलिसांकडे तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यावर त्यामधून एक भयानक हत्याकांड समोर आले.

मृत सतीश याचे एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. दरम्यान, सदर  महिला ही विहाहित आहे. तसेच तिचे सतीश व्यक्तिरिक्त आणखी एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. या महिलेनेच तिचा पती आणि आधीच्या प्रियकरासोबत मिळून या तरुणाची हत्या केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे.

Web Title : सतारा में पत्नी, पति और प्रेमी ने मिलकर दूसरे प्रेमी की हत्या की।

Web Summary : सतारा में एक महिला, उसके पति और एक अन्य प्रेमी ने मिलकर उसके 27 वर्षीय प्रेमी सतीश गदास की हत्या कर दी। 14 जनवरी को लापता होने के बाद शरीर के टुकड़े कर दिए गए और बिखेर दिए गए। पुलिस जांच में चौंकाने वाला अपराध सामने आया।

Web Title : Woman, husband, and lover kill her other lover in Satara.

Web Summary : In Satara, a woman, her husband, and another lover murdered her 27-year-old boyfriend, Satish Gadas. The body was dismembered and scattered after he went missing on January 14th. Police investigation revealed the shocking crime.