जिल्हा परिषद निवडणुकांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 06:45 IST2026-01-12T06:45:54+5:302026-01-12T06:45:54+5:30
या याचिकेवर सकारात्मक निर्णय झाल्यास या निवडणुका मे-जूनपर्यंत लांबणीवर पडू शकतात.

जिल्हा परिषद निवडणुकांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका
सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर पुन्हा टांगती तलवार आली आहे. राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका एकत्रितच घ्याव्यात, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
या याचिकेवर सकारात्मक निर्णय झाल्यास या निवडणुका मे-जूनपर्यंत लांबणीवर पडू शकतात. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांच्या संघटनेची ही याचिका आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार या निवडणुकांची प्रक्रिया ३१ जानेवारीपूर्वी संपवायची आहे. त्यानुसार आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा पाळलेल्या १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया येत्या आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा होती. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात नियोजित होत्या. मात्र, या सर्व घडामोडीत ही याचिका आली आहे.