शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 06:05 IST

छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागात मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा

अजय पाटीलजळगाव : महाराष्ट्रात मान्सूनने समाधानकारक प्रगती केली आहे. ७ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. त्यात कोकण, नाशिक, पुणे, अमरावती या चार विभागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगर व नागपूर या दोन विभागांत अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

मराठवाड्यातील चिंता कायमछत्रपती संभाजीनगर विभागात समाविष्ट असलेल्या आठही जिल्ह्यांमध्ये ७ जुलैपर्यंत सरासरीच्या १०० टक्क्यांपर्यंतही पाऊस झालेला नाही. या विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ९८ टक्के पाऊस झाला आहे.  बीड जिल्ह्यात सर्वात कमी ४४ टक्के, त्या खालोखाल लातूरमध्ये ५३ टक्के आणि परभणी जिल्ह्यात ५५ टक्के पाऊस झाला आहे. जालना, धाराशिव, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही पावसाची स्थिती समाधानकारक नाही. ज्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत आहेत.

नागपूर विभागात गडचिरोली वगळता इतरत्र तूटनागपूर विभागात केवळ गडचिरोली जिल्ह्यातच सरासरीच्या १२५ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, इतर पाच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे. वर्धा जिल्ह्यात सर्वात कमी ६६ टक्के पाऊस झाला आहे.

गेल्या दोन महिन्यांत अशा कोसळल्या जलधाराजून महिना : जूनमध्ये सरासरी २०७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यावर्षी ३० जूनपर्यंत राज्यात २०६ मिमी पाऊस झाला आहे.जुलै महिन्याची सुरुवात : जुलैच्या पहिल्या सात दिवसांत (७ जुलैपर्यंत) सरासरी ७४.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो, तर प्रत्यक्षात ७४.४ मिमी पाऊस झाला आहे.

एकूण पाऊस : जून आणि ७ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात सरासरी २८२ मिमी पाऊस अपेक्षित असताना २८० मिमी पाऊस झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस