शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत ६ गावठी कट्टयासह ९ काडतुसे जप्त

By admin | Updated: September 13, 2016 13:44 IST

मखमलाबादरोडवरील ड्रीम कॅस्टल चौकात फिरणाऱ्या तिघा संशयितांकडून पंचवटी पोलिसांनी सव्वालाख रूपये किंमतीचे ६ गावठी पिस्तुल व ९ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १३ -   मखमलाबादरोडवरील ड्रीम कॅस्टल चौकात फिरणाऱ्या तिघा संशयितांकडून पंचवटी पोलिसांनी सव्वालाख रूपये किंमतीचे ६ गावठी पिस्तुल व ९ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.
 
याबाबत माहिती अशी की मखमलाबादरोड परिसरातील ड्रीम कॅस्टल चौकात सोमवारी रात्री शक्तीसिंह कालुसिंह राजपूत (२६), राहणार गणदीप सोसायटी, पाथर्डी फाटा, संतोष विलास अल्हाट (२३) स्टेट बँक जवळ सिडको,  व सातपूरच्या संतोषी माता नगर येथिल सुनिल विष्णू नाथभजन (२५), हे तिघे संशयित गावठी पिस्तुल विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळाली होती त्यानुसार सोमवारी रात्री नऊ वाजता परिसरात सापळा रचण्यात आला होता.
 
पोलिसांना मिळालेल्या वर्णनानुसार ड्रीम कॅस्टल चौकातील सिग्नलजवळ तिघे संशयित फिरतांना दिसुन आले.पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ६ गावठी पिस्तुल व ९ जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी संशयितांची कसुन चौकशी केली असता त्यांनी गावठी पिस्तुल व काडतुसे विक्री करण्यासाठी आणली होती अशी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
पोलिस उपनिरीक्षक महेश इंगोले, पोलिस हवलदार विजय गवांदे, मोतीराम चव्हाण, सचिन म्हस्दे, आप्पा गवळी, प्रविण कोकाटे, सतीश वसावे, भूषण रायते, सुरेश नरवाडे, महेश साळुंखे, संदीप शेळके, संतोष काकड, दशरथ निंबाळकर, प्रभाकर पवार आदिंनी ही कारवाई केली आहे. 
 
पंचवटी परिसर पिस्तुल विक्री केंद्र?
पंचवटीतील मखमलाबादरोड परिसर गुन्हेगारी टोळीमुळे पहिल्या पासुन चर्चेत आहे. यापूर्वीही याच परिसरातून पोलिसांनी गावठी पिस्तुल जप्त केले होते तर काही दिवसांपूर्वी याच परिसरात गुन्हेगारी टोळीने गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी याच परिसरातून तब्बल ६ पिस्तुल व ९ काडतुसे जप्त केल्याने व संशयित आरोपींनी सदरचे पिस्तुल विक्रीसाठी आणल्याची कबुली पोलिसांना दिल्याने पंचवटी परिसर गावठी पिस्तुल विक्रीचे केंद्र बनल्याचे बोलले जात आहे.