२०२४ च्या लोकसभेसाठी मनसेचे ९ उमेदवार ठरले; 'या' मतदारसंघात निवडणूक लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 09:45 AM2023-10-07T09:45:30+5:302023-10-07T09:47:58+5:30

गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे सातत्याने पदाधिकारी बैठका घेत आहेत. त्यात लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली होती

9 MNS candidates for Lok Sabha 2024; Will you contest the election in 'this' constituency? | २०२४ च्या लोकसभेसाठी मनसेचे ९ उमेदवार ठरले; 'या' मतदारसंघात निवडणूक लढणार?

२०२४ च्या लोकसभेसाठी मनसेचे ९ उमेदवार ठरले; 'या' मतदारसंघात निवडणूक लढणार?

googlenewsNext

मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. मागील निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवत यातील बहुतांश जागा युतीनं जिंकल्या होत्या. परंतु पुढील वर्षी होणारी निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेनेही उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. त्यात राजकीय वर्तुळात मनसेच्या ९ उमेदवारांची चर्चा रंगली आहे.

मनसे लोकसभा निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जाते. त्यासाठी मनसेच्या स्थानिक पातळीवर संघटनात्मक नेतेमंडळी चाचपणी करत आहेत. त्यात संभाव्य उमेदवार म्हणून खालील नावांची चर्चा सुरू आहे.

कल्याण लोकसभा - आमदार राजू पाटील

ठाणे लोकसभा - अभिजित पानसे/ अविनाश जाधव

पुणे लोकसभा - वसंत मोरे

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा- शालिनी ठाकरे

दक्षिण मुंबई लोकसभा- बाळा नांदगावकर

छत्रपती संभाजीनगर लोकसभा - प्रकाश महाजन

सोलापूर लोकसभा - दिलीप धोत्रे

चंद्रपूर लोकसभा - राजू उंबरकर

रायगड लोकसभा - वैभव खेडेकर

गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे सातत्याने पदाधिकारी बैठका घेत आहेत. त्यात लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली होती. हे नेते त्या त्या भागात जाऊन मतदारसंघातील ताकदीचा आढावा घेत आहेत. शुक्रवारी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर हे छत्रपती संभाजीनगरला पोहचले होते. यावेळी ते म्हणाले की, लोकसभा मतदारसंघातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास आम्ही केला आहे. आमचा पक्ष बाळासाहेबांच्या विचारधारेवर चालणारा आहे. जे चूक आहे ते ठणकावून सांगणारा आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत आधीचे असो वा आताचे सरकार विचारधारा सोडून केवळ सत्तेसाठी एकत्र आलेत. सत्तेतून पैसा कमावतात, लोकांच्या प्रश्नांशी त्यांना देणेघेणे नाही. विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे २०-२५ जागा लढवणार असल्याचेही मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. तत्पूर्वी मनसे नेत्या शालिनी ठाकरे, वसंत मोरे यांचे त्यांच्या मतदारसंघात भावी खासदार असे बॅनर्स झळकले आहेत.

Web Title: 9 MNS candidates for Lok Sabha 2024; Will you contest the election in 'this' constituency?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.