८० % अर्जदार शिक्षकांच्या मातांना कॅन्सर !

By Admin | Updated: June 20, 2015 00:20 IST2015-06-20T00:20:38+5:302015-06-20T00:20:38+5:30

कौटुंबिक अथवा आजारपणामुळे येणाऱ्या अडचणी समजू शकतात. परंतु, बदलीला स्थगिती देण्यासाठी आलेल्या अर्जांपैकी ८० टक्के शिक्षकांच्या मातांना कॅन्सर आहे.

80% of applicant teachers' mothers cancer! | ८० % अर्जदार शिक्षकांच्या मातांना कॅन्सर !

८० % अर्जदार शिक्षकांच्या मातांना कॅन्सर !

पुणे : कौटुंबिक अथवा आजारपणामुळे येणाऱ्या अडचणी समजू शकतात. परंतु, बदलीला स्थगिती देण्यासाठी आलेल्या अर्जांपैकी ८० टक्के शिक्षकांच्या मातांना कॅन्सर आहे. तर ९० टक्के शिक्षकांनी वडिलांना अर्धांगवायू झाल्याचे म्हटले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. या सर्व अर्जांची आरोग्य विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये गुरुवारी सायंकाळी तावडे हे पत्रकारांशी बोलत असताना एक शिक्षक बदलीला स्थगिती मिळविण्यासाठी अर्ज घेऊन आला. त्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, राज्यातील शिक्षकांच्या पालकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात हे आजार कसे झाले, याबाबत शंका निर्माण होत आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणासाठी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या पालकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
वैद्यकीय कारणासाठी राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या शिक्षकांच्या बदली करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. याच कारणास्तव संपूर्ण राज्यातून शासनाकडे हजारो शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज आले आहेत. यामध्ये सुमारे ८० ते ९० टक्के शिक्षकांनी अर्जामध्ये आपल्या आईला किंवा वडिलांना कॅन्सर, अर्धांगवायू आणि ह्रदयविकार झाल्याचे कारण दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 80% of applicant teachers' mothers cancer!