शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅट रद्दमुळे सांगलीत झाली ६० कोटींची बचत...

By admin | Updated: March 19, 2015 23:56 IST

शेतकरी, व्यापाऱ्यांना दिलासा : सांगलीतील व्यापार वाढीला चालना, मार्केट यार्डात उत्साह

अंजर अथणीकर - सांगली राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बेदाणा, हळद व गुळावरील लागू होणारा व्हॅट रद्द केल्याने, सांगलीतील व्यापारी व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जवळपास ६० कोटींहून अधिक रुपयांचा बसणारा भुर्दंड वाचला आहे. यामुळे व्यापाराला चालना मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या खिशाला बसणारी चाटही वाचली आहे. सांगलीतील मार्केट यार्डमधून चालणाऱ्या महत्त्वाच्या व्यापारामध्ये बेदाणा, हळद, गूळ या शेतीमालाचा समावेश आहे. हळदीच्या बाजारासाठी सांगली हे महत्त्वाचे केंद्र आहे. आता बेदाण्याबरोबरच गुळासाठीही सांगली ही महत्त्वाची बाजारपेठ ठरत आहे. सांगलीमध्ये हळदीची वर्षाला सुमारे आठ ते नऊ लाख पोत्यांची (एक पोते : ७० किलो) उलाढाल होत असते. हळदीची सुमारे ४०० ते साडेचारशे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. त्याचबरोबर बेदाण्याची सुमारे आठशे ते नऊशे कोटी रुपयांची उलाढाल असून, गुळाची सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची उलाढाल आहे. चार वर्षापूर्वी बेदाण्यावर चार टक्के व्हॅट लावण्यात आला होता. गुळावरही व्हॅट होता. अनेक आंदोलने व मागण्यांनंतर तो आघाडी सरकारने रद्द केला. आता हळदीसह गूळ, बेदाण्यावर तीन ते चार टक्के व्हॅट (मूल्यवर्धित कर प्रणाली) लागू करण्याचा शासनाचा मानस होता. मात्र खा. संजय पाटील यांच्यासह सांगली-तासगाव बेदाणा मर्चंट असोसिएशन, चेंबर आॅफ कॉमर्स यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानेच या शेतीमालावरील व्हॅट रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. गेल्या आठ वर्षापासून बेदाणा, हळद, गूळ यावर आकारण्यात येणारा व्हॅट प्रत्येक अर्थसंकल्पात रद्द करण्यात आला होता. व्हॅट रद्द झाल्याने सांगलीमध्ये होणाऱ्या हळदीवरील सुमारे बारा ते पंधरा कोटी, बेदाण्यावरील सुमारे ३६ कोटी व गुळावर लागू होणारा सुमारे दहा कोटी व्हॅट आता वाचला आहे. यामुळे आता व्यापार वाढीसाठी तर चालना मिळणार आहेच, शिवाय कर्नाटकात व्यापार स्थलांतरित होण्याची भीतीही कमी झाली आहे. हळदीवरील व्हॅट रद्दने सुमारे बारा ते पंधरा कोटी रुपयांची शेतकऱ्यांची बचत झाली आहे. या निर्णयाने व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर व्यापार कर्नाटकात स्थलांतरित होण्याची भीती नाहीशी झाली आहे. यामुळे आता हळद व्यापाराला दिलासा मिळाला आहे.- मनोहर सारडा, हळद व्यापारी, सांगलीसांगली जिल्ह्यामध्ये आठशे ते नऊशे कोटी रुपयांची वर्षाला बेदाण्यामध्ये उलाढाल होत असते. यावर सुमारे चार टक्के व्हॅट कर लागू होण्याची शक्यता होती. यामुळे आता ३५ ते ३६ कोटी वाचले आहेत. यापूर्वी आघाडी सरकारने हा कर रद्द केला होता. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.- राजेंद्र कुंभार, बेदाणा व्यापारी असोसिएशन