५८ वर्षीय सतीश आपटेंची २० वर्षीय पत्नी बेपत्ता

By Admin | Updated: July 16, 2015 13:47 IST2015-07-16T13:45:34+5:302015-07-16T13:47:39+5:30

माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरलेल्या ५८ वर्षीय सतीश आपटेंची २० वर्षीय पत्नी लिसा अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे.

58-year-old Satish Apte's 20-year-old wife missing | ५८ वर्षीय सतीश आपटेंची २० वर्षीय पत्नी बेपत्ता

५८ वर्षीय सतीश आपटेंची २० वर्षीय पत्नी बेपत्ता

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - 'प्रेमाला वयाचे बंधन नसते' अस सांगत ५८ वर्षांच्या सतीश आपटेंनी आपल्याहून ३० वर्षांनी लहान असलेल्या लिसाच्या गळ्यात माळ घातली खरी... मात्र एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांमध्ये लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच खटके उडू लागले आणि आता त्यांची नववधू लिसा ही घरातून बेपत्ता झाली आहे. आपली २० वर्षीय पत्नी अमृता उर्फ लिसा आपटे ३० जूनपासून घरातून बेपत्ता झाली असल्याची तक्रार सतीश आपटेंनी नपाडा पोलिस स्थानकांत नोंदवली आहे. 
प्रसारमाध्यमातील ग्लोबल कपल म्हणून प्रसिद्ध झालेले पत्रकार सतीश आपटे ( वय ५८) व मुंबईतील जाहिरात उद्योगाचे जनक असलेल्या प्रख्यात उद्योगपती गोकुळदास कापडीयांची  नात लिसा कापडिया ( वय २० ) या दोघांचा १ जानेवारी २०१५ रोजी विवाह पार पडला. एकमेकांमध्ये तब्बल ३८ वर्षांचे अंतर असूनही त्यांनी विवाह केला, त्यांचे 'लग्न' म्हणजे एक ब्रेकिंग न्यूज ठरली होती. त्यामुळे त्यांच्या लग्नातील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 
मात्र लग्नाला सहा महिने उलटत नाहीत तोच सतीश व लिसा यांच्यात खटके उडू लागले, नव्याची नवलाई संपल्याने या दांपत्यामध्येही इतरांप्रमाणे वाद होऊ लागले आणि त्यातच आता लिसा बेपत्ता झाल्याची बातमी समोर येत आहे. माहेरी जाते असं सांगून ३० जून रोजी बाहेर पडलेली लिसा अद्याप घरी परतच आलेलीच नाही, तिच्या माहेरच्या घरीही कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाही, हे पाहून आपटे यांनी अखेरीस पोलिसांकडे धाव घेतली आहे पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून लिसा नेमकी गेली कुठे हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे.

Web Title: 58-year-old Satish Apte's 20-year-old wife missing