शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये ५८ हरित इमारती

By admin | Updated: October 13, 2015 02:58 IST

‘अनधिकृत बांधकामांचे शहर’ ही ओळख पुसून पिंपरी-चिंचवड आता ‘पर्यावरणपूरक इमारतीं’चे शहर म्हणून ओळखले जाणार आहे

पिंपरी : ‘अनधिकृत बांधकामांचे शहर’ ही ओळख पुसून पिंपरी-चिंचवड आता ‘पर्यावरणपूरक इमारतीं’चे शहर म्हणून ओळखले जाणार आहे. या शहरात आता ५८ ‘हरित इमारती’ उभ्या राहणार असून, त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या ५८ प्रकल्पांची ‘ग्रीहा’ या संस्थेकडे नोंद झाली असून, यामुळे सुमारे २२ लाख चौरस मीटर बांधकाम क्षेत्र हरित इमारतींमध्ये रूपांतरित होणार आहे.पर्यावरण संवर्धन व संरक्षणास चालना देण्याच्या दृष्टीने ग्रीन रेटिंग फॉर इंटिगे्रटेड हॅबिटेट अ‍ॅसेसमेंट (ग्रीहा) आणि स्मॉल व्हर्सेटाईल अ‍ॅफॉर्डेबल ग्रीन रेटिंग फॉर इंटिगे्रटेड हॅबिटॅट अ‍ॅसेसमेंट (स्वग्रीहा) ही पद्धती महापालिकेने राबविली आहे. जे बांधकाम व्यावसायिक अथवा नागरिक आपले बांधकाम ग्रीहा व स्वग्रीहाशी अनुरूप बनवतील, त्यांना प्रीमियममध्ये सवलत दिली जाते, तसेच ग्रीहा व स्वग्रीहामधील घरमालकांना मिळकत करावरदेखील सवलती दिल्या जातात. केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय आणि दि एनर्जी रीसर्च इन्स्टिट्यूट यांचे असोसिएशन आॅफ डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रीसर्च आॅफ सन्स्टेनेबल हॅबिटॅट या संस्थेमार्फत ग्रीहा व स्वग्रीहा ही ग्रीन रेटिंग सीस्टिम विकसित केली आहे.अडीच हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या इमारतींसाठी ‘ग्रीहा’ ही रेटिंग सीस्टिम लागू असून, अडीच हजार चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या इमारतींसाठी ‘स्वग्रीहा’ ही रेटिंग सीस्टिम लागू आहे. या रेटिंग सीस्टिमचा मुख्य उद्देश पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक इमारती बनविणे, इमारतींच्या पर्यावरणपूरकतेचे मूल्यमापन करणे हा आहे. आतापर्यंत ५८ प्रकल्प ‘ग्रीहा’ यांच्याकडे नोंदले गेले आहेत. त्यामुळे सुमारे २२ लाख चौरस मीटर बांधकाम क्षेत्र हरित इमारतींमध्ये रूपांतरित होणार आहे. या माध्यमातून वीज, पाणी यांची बचत होण्याबरोबरच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर सीस्टिम याचाही नागरिकांना फायदा होणार आहे.