शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

५५ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

By admin | Updated: January 14, 2017 04:50 IST

पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा २५ टक्क्यांच्या मोबदल्यावर बदलण्यासाठी आलेल्या सात जणांना ठाणे गुन्हे शाखेच्या

ठाणे : पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा २५ टक्क्यांच्या मोबदल्यावर बदलण्यासाठी आलेल्या सात जणांना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे ५५ लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. त्या जुन्या नोटांमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ताब्यात घेतलेल्या सात जणांमध्ये एका व्यापारी दाम्पत्याचा समावेश असून ते राजापूर येथील रहिवासी आहे. त्या सात जणांची आयकर विभागामार्फत सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.वर्तकनगर परिसरात काही जण जुन्या नोटा बदलण्यासाठी येत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटचे पोलीस हवालदार नथुराम चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने गुरुवारी रेमण्ड कंपनीच्या वाहन पार्किंग झोनमध्ये सापळा रचून ही कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत विधाते, सुखदेव सोनावणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू महाले, पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर, नवनाथ वाघमारे व पोलीस नाईक नीशा करांडे या पथकाने एका कारमधून तिघांना, तर दुसऱ्या कारमधून त्या व्यापारी दाम्पत्यासह चौघांना ताब्यात घेतले. या वेळी पहिल्या कारमधून २९ लाख ६७ हजार ५०० रुपयांच्या एक हजाराच्या ५२१ नोटा, तर ४ हजार ८७९ पाचशे रुपयांच्या नोटा, तर दुसऱ्या कारमधून २४ लाख ९४ हजार ५०० रुपयांच्या एक हजाराच्या ७९५, तर तीन हजार ३९९ पाचशे रुपयांच्या नोटा मिळून आल्या. अशा ५४ लाख ६२ हजारांच्या एकूण जुन्या नोटा आहेत. (प्रतिनिधी)