शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील प्रमुख गणेशोत्सवांचा ५०० कोटींचा विमा

By admin | Updated: September 5, 2016 05:13 IST

दरवर्षी गणेशोत्सवाला वाढत जाणारी गर्दी आणि त्या अनुषंगाने उद््भवू शकणारे धोके लक्षात घेऊन या उत्सवांना विमा कवचाने सुरक्षित करण्याचा नवा कल

मुंबई : दरवर्षी गणेशोत्सवाला वाढत जाणारी गर्दी आणि त्या अनुषंगाने उद््भवू शकणारे धोके लक्षात घेऊन या उत्सवांना विमा कवचाने सुरक्षित करण्याचा नवा कल दिसून येत असून, मुंबईतील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिळून यंदा ५०० कोटींचा विमा उतरविला असल्याची माहिती मिळते.प्रसिद्ध देवस्थाने व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी होणाऱ्या जत्रांखेरीज देशाच्या विविध भागांत लाखोंच्या सहभागाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्रौत्सव व दुर्गापूजा यांसारखे उत्सव डोळ्यांपुढे ठेवून सर्वसाधारण विमा कंपन्यांनी अनेक प्रकारचे धोके व अपघात एकत्रितपणे ‘कव्हर’ होतील, अशा खास विमा पॉलिसींची आखणी केली आहे. या उत्सव मंडळांची उलाढाल कोट्यवधींच्या घरात असल्याने व अल्पावधीचा हा विमा तुलनेने कमी हप्त्यात उपलब्ध होत असल्याने उत्सवांचा विमा हळूहळू लोकप्रिय होत आहे. विमा कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्सवाच्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यापासून तिचे विसर्जन होईपर्यंत ही विमा पॉलिसी लागू असते. यात मूर्ती, तिचे दागिने, सजावट, मंडप, रोशणाई, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांचा निरनिराळ्या रकमेचा विमा उतरविता येतो. शिवाय उत्सवांच्या ठिकाणी काही घात-अपघात होऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची जीवितहानी झाली किंवा परिसरातील मालमत्तेची हानी झाली तर त्यांना द्यायच्या भरपाईचीही या विम्यात सोय असते. विसर्जनाच्या वेळी दुर्दैवाने कोणाचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांनाही उत्सव मंडळे या विम्यातून भरपाई देऊ शकतात. यातील प्रत्येक गोष्ट व घटना यासाठी किती रकमेचा विमा हवा हे मंडळ ठरवू शकते व त्या प्रत्येकासाठी प्रीमियमचा निरनिराळा दर असतो. सर्वाचे एक पॅकेज करून पॉलिसीचा एकरकमी प्रीमियम ठरविला जातो. रीतसर नोंदणी झालेल्या मंडळांनाच हा विमा परतविता येतो. या प्रीमियमचा दर एक लाखाच्या विम्यासाठी तीन हजार रुपयांपासून दोन कोटींच्या विम्यासाठी २.५ लाख रुपयांपर्यंत आणि त्याच्या पटीत असू शकतो. (विशेष प्रतिनिधी)