शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘गावगणपती’ची ४५० वर्षांची अखंडित परंपरा

By admin | Updated: September 20, 2015 23:57 IST

नवसाचा दैवत कुळाचा गणपती : ओटवणेत रक्तवर्ण स्वरूपात मूर्ती; दर्शनासाठी गर्दीचा महापूर

ओटवणे : साडेचारशे वर्षांपासूनची धार्मिक ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावातील एक नवसाचे दैवत म्हणजे कुळाचा गणपती. यालाच ‘गाव गणपती’ असे म्हणतात. प्रत्येकाच्या घरी ‘श्रीं’ची मूर्ती विराजित झाली असली, तरी प्रत्येक भक्ताच्या मनोमनी या गाव गणपतीचा विसावा मात्र कायम असतो. त्यामुळे येथे दर्शनासाठी मोठी गर्दी कायमच असते. रक्तवर्ण स्वरूपाच्या असलेल्या या मूर्तीचे पावित्र्य तेवढ्याच सात्त्विकतेने जपावे लागते. या मूर्तीच्या जडणघडणीपासून ते विसर्जनापर्यंत पारंपरिक रीतिरिवाज आणि सात्त्विकतेचे अपूर्व असे दर्शन पडते. ओटवणे येथील सिद्धहस्त मूर्तिकार कै. अनंत मेस्त्री यांच्या कार्यशाळेत मूर्तिकार व कलावंत चंद्रकांत मेस्त्री हे ही मूर्ती घडवितात. ही मूर्ती घडविण्यासाठी मातीच्या गोळ्यांपाून ते नेत्र उघडण्यापर्यंत विविध धार्मिक रीतिरिवाज आहेत. चतुर्थीच्या दिवशीच म्हणजेच हरितालिकेच्या दिवसाच्या रात्री १२ नंतर या मूर्तीचे काम हाती घेतले जाते. विधीवत मातीच्या ओल्या गोळ्याची गावप्रमुख मानकरीकडून पूजा झाल्यानंतर या मातीला पाच फुटांएवढा गणपतीचा आकार देण्यात येतो. सर्व कामे हस्त कारागिरीत असावी लागतात. हा गणपती रक्तवर्ण असल्याने त्याला लाल रंगाचीच शेड वापरावी लागते. सूर्यास्तानंतर (मध्यरात्री) हाती घेतलेले हे काम पूर्ण करून सूर्योदयापूर्वी विधीवत पूजा-अर्चा, गाव गाऱ्हाणे झाल्यानंतरच या मूर्तीचे नेत्र उघडले जातात.मूर्ती स्थानापन्न झाल्यानंतर गणपती हा रक्तवर्ण स्वरूपाचा असल्याने त्याची सोज्वळता अधिक जपावी लागते. या गाव गणपतीचे पूजन गाव पुरोहित बंड्या केळकर यांच्या हस्ते होते. त्यानंतर गावातील इतर गणपतींचे पूजन करण्याची प्रथा आजही रूढ आहे. गाव रहाटीतील अडीअडचणीनुसार या मूर्तीचे दिवस ठरविले जातात. जेणेकरून सर्वांना या मूर्तीचे दर्शन घेता यावे. मूर्तीच्या विसर्जनावेळीसद्धा पारंपरिक धार्मिकता आहे. चित्रशाळेतून गाव गणपती विराजमान करण्यासाठी आणि विसर्जनासाठी मूर्ती ने-आण करण्यासाठी पालखीतून राजेशाही पद्धतीने मिरवणूक काढली जाते.मूर्तीचे विसर्जन राजे खेम सावंतांच्या माठ्याजवळील नदी, दाभिल नदी व तेरेखोल नदीच्या त्रिवेणी संगमावर केले जाते. जवळजवळ पाच फुटी जड मूर्ती दोन किलोमीटर अंतरावरील या संगमावर विसर्जनासाठी पालखी मिरवणुकीने ढोल-ताशाच्या गजरात नेली जाते. मूर्ती जड आणि लांब अंतर असूनही गाडीचा वापर केला जात नाही. तसे केल्यास प्रवासात विविध अडचणी येतात, असे जाणकार लोक सांगतात.आज प्रत्येकाच्या घरी ‘श्री’ विराजमान होतात. तरीही नवसाला पावणाऱ्या या कुळाच्या गणपतीच्या (गाव गणपतीच्या) दर्शनासाठी भाविकांची रीघ लागत आहे. घरात मानाचा गणपती असला तरी संस्कृतीची नाळ जोपासत येथील ग्रामस्थ गावगणपतीलाच मोठ्या प्रमाणात आपल्या गणेशोत्सवात मान देतात. हे एकप्रकारे गावाच्या एकीचे प्रतीकच आहे. (वार्ताहर)