शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

पालखी मार्ग प्रकाशमय करण्यासाठी ४३९ कर्मचारी, ५५ अधिकारी रात्रंदिवस करू लागले काम

By appasaheb.patil | Published: June 26, 2019 8:09 PM

महावितरण: आषाढीच्या पार्श्वभूमीवर मेंटेनन्सची कामे पूर्ण, अतिरिक्त १३ रोहित्र बसविले

ठळक मुद्देपंढरपुरात होणाºया आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासनाकडून विविध सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेतजिल्ह्यातील पालखी मार्गावर २४ तास वीजपुरवठा करण्यासाठी १३ अतिरिक्त रोहित्र बसविण्यात आली पालखी मार्ग प्रकाशमय करण्यासाठी ४३९ कर्मचारी, ५५ अधिकारी, उपअभियंते, शाखा अभियंते, जनमित्रांसह खासगी कर्मचाºयांची नियुक्ती

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : पंढरपुरात होणाºया आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासनाकडून विविध सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत जिल्ह्यातील पालखी मार्गावर २४ तास वीजपुरवठा करण्यासाठी १३ अतिरिक्त रोहित्र बसविण्यात आली आहेत़ शिवाय पालखी मार्ग प्रकाशमय करण्यासाठी ४३९ कर्मचारी, ५५ अधिकारी, उपअभियंते, शाखा अभियंते, जनमित्रांसह खासगी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पालखी तळावर ग्रामपंचायत व देवस्थान प्रमुखांनी संबंधित अधिकाºयांकडे वीजजोडणीसाठी अर्ज केल्यास महावितरणकडून एका मिनिटात वीजजोडणी देण्याची यंत्रणा तयार करण्यात आल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

पंढरपुरात होणाºया आषाढी वारीसाठी देहू, आळंदीहून निघालेला संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ६ जुलै रोजी धर्मपुरी येथून जिल्ह्यात प्रवेश करून नातेपुते येथे मुक्कामी थांबणार आहे़ शिवाय श्री संत तुकाराम महाराजांची पालखी ७ जुलै रोजी अकलूज येथे जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरीमार्गे पंढरपूरकडे येते. श्री संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज, श्रीपूर, बोरगाव, तोंडले-बोंडले, पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरीमार्गे पंढरपुरात येते़ या दोन्ही पालखी मार्गावर प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने महावितरणकडून यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

वीजवितरणच्या कामात सुसुत्रता येण्यासाठी काही खासगी कर्मचाºयांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

पालखी तळावर एका मिनिटात वीजजोडणी- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू-आळंदी येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे़ दोन्ही सोहळे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पालखी मार्गावर नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी एकूण १० पालखी तळ आहेत़ या पालखी तळावर ग्रामपंचायत कार्यालय अथवा तेथील देवस्थानकडून पालखीतील लोकांना वीजपुरवठा केला जातो़ ज्या ग्रामपंचायतीकडे वीजजोडणी नाही अशा ग्रामपंचायत अथवा देवस्थान व वैयक्तिक ग्राहकाने महावितरणच्या संबंधित अधिकाºयाकडे अर्ज केल्यास एका मिनिटात वीजजोडणी देण्याची यंत्रणा उभी करण्यात आली आहे़ 

ट्रान्सफॉर्मर व लोखंडी पाईपला घातले आवरण- पंढरपुरात येणाºया भाविकांना विजेचा धक्का लागू नये अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महावितरणकडून पंढरपूर शहर व पालखी मार्गावरील प्रत्येक ट्रान्सफॉर्मर व लोखंडी पाईपला पीव्हीसी पाईपचे आवरण घालण्यात आले आहे़ आवरण घालण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून १ जुलै अखेर पूर्णपणे काम होईल, अशी माहिती महावितरणने दिली़ 

२४ तास अधिकारी, कर्मचारी अलर्ट असणार- पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी येणाºया भाविकांना सुरक्षित वारीचा अनुभव व्हावा, यासाठी महावितरणचे ५५ अधिकारी व ४३९ कर्मचारी, जनमित्र, वायरमन २४ तास सेवा बजावणार आहेत़ कोणत्याही भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीज सुरू करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत़ याकामी पंढरपुरात येणाºया भाविकांनी महावितरणच्या प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे़

पंढरपूर शहर व पालखी मार्गावरील लोंबकळणाºया तारा, ताराला स्पर्श होणाºया झाडांच्या फांद्या आदी मेंटेनन्सची कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे़ आषाढी वारीकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही अलर्ट राहणे काळाची गरज आहे.- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारीmahavitaranमहावितरण