शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड-कन्नड रस्त्यावरचा ४० वर्ष जूना पुल कोसळला, ४ जखमी

By admin | Updated: September 5, 2016 21:01 IST

सिल्लोड कन्नड रस्त्यावरील मोढा वाडी जवळ ४० वर्ष जुना पूल कोसळला. या दुर्घटनेत दोन मोटारसायकली खाली कोसळून चार जण जखमी झाले.

ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. ५ - सिल्लोड कन्नड रस्त्यावरील मोढा वाडी जवळ ४० वर्ष जुना पूल कोसळला. या दुर्घटनेत दोन मोटारसायकली खाली कोसळून चार जण जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृति चिंताजनक आहे. त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार करून औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली.
 
या अपघातात गंभीर जख्मी झालेल्या इसमांची नावे अशी:- गोविंदा तुकाराम पंडित वय ४५,बाळू आनंदा पंडित वय २५ दोघे रा.मोढ़ा खुर्द व अजयसिंग तुकाराम राजपूत वय २५ रा.बोरगाव बाजार,आरती भारत बारवाल वय २८ रा.अन्वा यापैकी गोविंदा पंडित व बाळू पंडित हे दोघे गंभीर जख्मी झाले असून त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.
 
सोमवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान मोटारसायकल क्र.एम.एच.२० ए.ई.०१३२ यावर गोविंदा पंडित व बाळू पंडित हे सिल्लोड येथून मोढ़ा येते जात होते तर दूसरी मोटारसायकल क्र.एम.एच.२०.ए.एल.४०५३ या वरुण आजयसिंग राजपूत व आरती बारवाल हे दोघे जन बोरगावहुन अन्वा येथे जात असतांना अचानक पुल कोसळल्याने हे दोघे मोटारसायकलस्वार वीस फुट खाली कोसळून जखमी झाले. 
सिल्लोड कन्नड रस्त्यावरील पुल कोसळल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. या रस्त्या वरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.म्हणून सिल्लोड कन्नड डेपो च्या 10 बस रद्द करण्यात आल्या आहेत, तर सिल्लोड, कन्नड, पाचोरा, चाळीसगाव,मालेगाव, डेपो च्या ४५ बस च्या फेऱ्या सिल्लोड कन्नड मार्गा ऐवजी गोलेगाव, हट्टी, बहुली, भराडी, मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
- बाबासाहेब साळुंके वाहतूक नियंत्रक सिल्लोड आगार