शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

विष्णूप्रयाग येथे अडकले औरंगाबादचे ३२ पर्यटक

By admin | Published: May 19, 2017 8:43 PM

बद्रीनाथपासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विष्णूप्रयाग येथे शुक्रवारी (दि.१९) दरड कोसळल्यामुळे सुमारे १५ हजार पर्यटक तेथे अडकले आहेत.

ऑनलाइन लोकमत/मयूर देवकर औरंगाबाद, दि. 19 - बद्रीनाथपासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विष्णूप्रयाग येथे शुक्रवारी (दि.१९) दरड कोसळल्यामुळे सुमारे १५ हजार पर्यटक तेथे अडकले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे दीड हजार पर्यटकांचा समावेश असून औरंगाबादचे ३२ पर्यटक सुखरूप असल्याची माहिती मंगेश कपोते आणि श्रीपाद जोशी यांनी दूरध्वनीद्वारे लोकमतला दिली.बद्रीनाथ ते जोशीमठ मार्गावर विष्णूप्रयाग हे गाव आहे असून मार्ग बंद झाल्यामुळे दोन्हीबाजूला हजारो वाहने जागेवर थांबलेली आहेत. प्रत्यक्षदर्शी मंगेश कपोते यांनी सांगितले की, दुपारी दोन वाजता रस्त्यावर डोंगरावरून छोटे-छोटे दगड पडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे आम्ही गाडी थांबवली. आमच्या मागे असणारी गाडी समोर गेली. तिला दगडांचा मारा बसला मात्र वेग वाढवून ते समोर निघून गेले. पाहतापाहता संपूर्ण डोंगरच आमच्या डोळ्यासमोर खाली कोसळला आणि रस्ता पूर्णपणे बंद झाला. परिस्थिती ओळखून मग आम्ही गाडी वळवून सुरक्षित स्थळी आलो.संकटकाळी लयलूटविष्णूप्रयागच्या आसपास असणारे गोविंदघाट आणि पांडूकेशर गावांतील हॉटेल्समध्ये थांबण्याशिवाय पर्यटकांकडे दुसरा पर्याय नव्हता. मात्र अशा संकटसमयी मदत करायची सोडून हॉटेल मालकांनी आर्थिक कमाई करण्याचा स्वार्थ आधी पाहिला. सामान्यत: ७०० रुपये भाडे असणाऱ्या रुमचे हॉटेल मालकांनी असहाय्य पर्यटकांकडून ७ ते ८ हजार रुपये वसूल केले. त्याचबरोबर जेवणाचे दरही वाढविण्यात आले. १५ हजार पर्यटकांची व्यवस्था आसपासच्या गावात होणे शक्य नाही. म्हणून जो तो आयती चालून आलेल्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलीसांनी गावातील एका गुरुद्वारास विनंती करून ३००-४०० पर्यटकांची राहण्याची व्यवस्था केली. स्थानिकांच्या असंवेदनशीलतेमुळे हजारो लोकांनी रस्त्यावरच आश्रय घेतला. रात्री पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हालापेष्टा आणखी वाढणार असे दिसतेय, असे कपोते म्हणाले. सुरक्षित स्थळांची माहिती व सूचना पोलीस देत आहेत.सर्व नियोजनच फिसकटलेदरड कोसळल्याने चार धाम यात्रा करण्यास निघालेल्या अनेक यात्रेकरूंचे सगळे नियोजनच फिसकटले आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत तरी वाहतूक सुरू होणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासाचे रेल्वे आणि विमान तिकिट बुक केलेल्या यात्रेकरूंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होईल. ऐनवेळी तिकिट व प्रवासाच्या खर्चाचा अधिक भुर्दंड सोसावा लागणार. अडक लेल्या पर्यटकांमध्ये अनेक लहान मुले आहेत. वातावरण बिघडले किंवा रस्ता लवकर सुरू झाला नाही तर काय अशी चिंता सर्वांना सतावत आहे.सुदैवाने सर्व सुखरूपउत्तराखंडच्या डोंगर भागातील या गावात मोबाईल नेटवर्क अत्यंत कमजोर असून संपर्क करणे कठीण होऊन बसले आहे. महत्प्रयासाने मोबाईलवर कॉल लागत आहे. असे असले तरी औरंगाबादचे सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे माहिती कपोती यांनी कळविली. बातमी लिहिते वेळेपर्यंत महाराष्ट्र राज्य प्रशासनाकडून मदत मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. अडकलेल्या पर्यटकांमध्ये श्रीपाद जोशी, पी. एन. देशमुख, विकास मोहरीर, तुकाराम देवकर, प्रकाश पैठणकर यांचा समावेश आहे.