शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पवार, तटकरेंच्या ३०८ बोगस कंपन्या

By admin | Updated: October 24, 2015 03:53 IST

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी ३०८

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी ३०८ बोगस कंपन्या स्थापन करून ८०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा आरोप भाजपाचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांनी आज पत्रपरिषदेत केला. तर राज्यातील भाजपा सरकारवर भ्रष्टाचाराचे नवनवे आरोप होत असताना त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे बिनबुडाचे आरोप सोमय्या करीत असल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. सोमय्या यांनी आरोप केला की, तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील कोंढाणे धरण प्रकल्पाला एका दिवसात परवानगी देताना निविदेची किंमत ५८ कोटी रुपयांवरून ४०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली.हे कंत्राट एफए कन्स्ट्रक्शनला देण्यात आले. या कंत्राटदाराने नेत्यांना लाच देण्यासाठी युनियन बँकेतून ८०० कोटी रुपये काढल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले आहे. हे ८०० कोटी पचवण्यासाठी कोट्यवधीची बोगस बिले सादर करण्यात आली. तसेच कोंढाणे धरणाची किंमत ही वारंवार वाढवल्याचा दावाही सोमय्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)भाजपा सिंचन प्रकल्पावरून मीडिया ट्रायल करीत आहे. सोमय्या यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी ती माहिती तपासयंत्रणांना दिली पाहिजे, सरकार त्यांचेच आहे. काय चौकशी करायची त्यांनी करावी, परंतु केवळ स्टंटबाजी करणे सोडून द्यावे. - नवाब मलिक, राष्ट्रवादी प्रवक्ते