शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांना ३० कोटींचा गंडा

By admin | Updated: June 16, 2015 03:02 IST

स्टॉक एक्सचेंज कंपनी स्थापन करून त्याचे सभासद करण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची तब्बल ३० कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

नवी मुंबई : स्टॉक एक्सचेंज कंपनी स्थापन करून त्याचे सभासद करण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची तब्बल ३० कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशनमध्ये कंपनीचे मालक व चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी रेल्वे स्टेशन ७ नंबर टॉवरच्या पाचव्या मजल्यावर इंटर कनेक्टेड स्टॉक एक्सचेंज प्रा. लि. नावाची कंपनी सुरू होती. कंपनीचे चालक व मालक यांनी स्टॉक एक्सचेंज कंपनी स्थापन करून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. सदर कंपनीचे सभासद होण्यासाठी ५ लाख रुपये फी घेतली होती. प्रत्येक वर्षी २५ हजार रुपये जमा करण्यात आले होते. १९९९ पासून आतापर्यंत जवळपास १५ वर्षे अनेकांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. परंतु गुंतवणूकदारांचे पैसे परत न मिळाल्यामुळे संबंधितांविरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरीमधील रहिवासी बी. आर. पालवे व इतर गुंतवणूकदारांनी याविषयी तक्रार केली आहे. तब्बल ३० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी कंपनीचे मालक, चालक, कंपनीमधील शिरामण, आशिष नावाच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून वाशी पोलीस पुढील तपास करत आहेत. याविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी वाशी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला, परंतु तपास सुरू असल्यामुळे अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. (प्रतिनिधी)