शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन एनर्जी कॉरिडोरमध्ये २७ योजना

By admin | Updated: October 1, 2015 03:08 IST

केंद्र सरकारच्या ग्रीन एनर्जी कॉरीडॉर कार्यक्रमांतर्गत महापारेषण या सरकारी कंपनीने आखलेल्या २७ योजनांची अंमलबजावणी केली जाणार असून त्याकरिता आवश्यक ३६७ कोटी रुपयांच्या

मुंबई : केंद्र सरकारच्या ग्रीन एनर्जी कॉरीडॉर कार्यक्रमांतर्गत महापारेषण या सरकारी कंपनीने आखलेल्या २७ योजनांची अंमलबजावणी केली जाणार असून त्याकरिता आवश्यक ३६७ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या योजनेतून २५७० मेगावॅट अतिरिक्त ऊर्जानिर्मिती होणार आहे.बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यात पाच वर्षांत १४ हजार ४०० मे.वॅ. अपारंपारिक ऊर्जानिर्मिती करण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यामध्ये ७५०० मे.वॅ. सोलार एनर्जी, १५०० मे.वॅ. विंड एनर्जी असणार आहे. त्याच कार्यक्रमांतर्गत नवीन वीज पारेषण वाहिन्या उभारून अतिरिक्त २५७० मे.वॅ. वीज पुरवठा केला जाणार आहे. त्याकरिता आंतरराज्यीय व राज्यांतर्गत पारेषण प्रणालीचे बळकटीकरण होणार आहे. ग्रीन एनर्जी कॉरीडॉर कार्यक्रमाकरिता येणाऱ्या एकूण खर्चाच्या २० टक्के (७३.४ कोटी) रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अंतर्गत निधीतून उभारण्यात येणार आहे. नॅशनल क्लीन एनर्जी फंडाकडून ४० टक्के (१४६.८ कोटी) रक्कम मिळणार आहे तर उर्वरित ४० टक्के (१४६.८ कोटी) रक्कम जर्मन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्जरुपाने उपलब्ध करून दिली जाणार आहे. नाशिकमध्ये इलेक्ट्रीक टेस्टींग लॅबकेंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान (सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट) या संस्थेला पश्चिम विभागीय केंद्रीय इलेक्ट्रीकल टेस्टींग लॅब स्थापन करण्यास नाशिक जिल्ह्यातील शिलापूर येथे १०० एकर जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. आतापर्यंत विद्युत संचातील दुरुस्तीकरिता बंगलोर येथे उपकरणे पाठवावी लागत होती. नागपूर जिल्ह्यातील धुटी येथे ६० एकर जमिनीवरही अशीच लॅब सुरु करण्यास यापूर्वी अनुमती दिली आहे. या दोन्ही लॅबच्या निर्मितीकरिता प्रत्येकी ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.खासगी कंपन्यांचे समभाग घेणारमागील सरकारने कुठलेही धोरण निश्चित न करता काही खासगी कंपन्यांमार्फत २ हजार मे.वॅ. वीज निर्मिती सुरु केली. २०२०-२०२५ या कालावधीत राज्यातील नवीन विजेची मागणी ५ हजार मे.वॅ. असेल. त्याकरिता राज्य सरकारने नव्याने प्रकल्प सुरु न करता या खासगी कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याचा प्रस्ताव असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)