शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणावर २३ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 22:36 IST

गेल्यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्हाभरात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली. टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे २३ कोटी २७ लाखांचा खर्च झाला आहे.

दुष्काळमुक्ती : पाचोरा व अमळनेर नपा पाणीपुरवठा योजनेवर सात कोटी खर्चजळगाव : गेल्यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्हाभरात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली. टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे २३ कोटी २७ लाखांचा खर्च झाला आहे. यासह पाचोरा व अमळनेर नगरपालिका पाणी पुरवठा योजनेवर सहा कोटी ९१ लाखांचा खर्च करण्यात आला आहे.

११९ गावांना १०३ टँकरद्वारे पाणी जिल्हा प्रशासनाकडून यावर्षी ११९ गावांमध्ये १०३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यात सर्वाधिक २८ टँकर हे जामनेर त्यापाठोपाठ २१ टँकर पारोळा तालुक्यात सुरु होते. यासह अमळनेर २०, चाळीसगाव १४ तर जळगाव तालुक्यातील ९ टँकरचा समावेश होता.

२३ कोटी २७ लाखांच्या अनुदानाला मंजुरीजिल्हा प्रशासनातर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा, विंधन विहिर, विहिर खोलीकरण, तात्पुरती पाणी योजना, ८० गाव पाणी पुरवठा योजना, पाचोरा नगरपालिका तात्पुरती पाणी योजना यासाऱ्यावर २३ कोटी २७ लाख ११ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या पैकी विविध २० कोटी ९१ लाखांच्या कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यात आले आहे.

जिल्ह्यात दुष्काळमुक्तीजिल्हा प्रशासनातर्फे दुष्काळीस्थितीचा सामना करण्यासाठी यावर्षी सुयोग्य नियोजन केले होते. यावर्षी २७१ गावांमधील २७७ विहिरींचे अधिग्रहण केले. १०२ गावांमध्ये ८४ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या. ५३६ गावांमध्ये १०३० नवीन विंधन विहिर घेण्यात येऊन ८७ गावांमध्ये १२५ नवीन कुपनलिका घेण्यात आल्या. ११७ गावांमध्ये विहिर खोलीकरण तर आठ गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती करण्यात आली. पाणी टंचाईसाठी प्रभावी उपाययोजना व यावर्षी चांगल्या पावसामुळे दुष्काळमुक्ती झाली आहे.