शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

२०५ रिक्षा वाढवणार कोंडी

By admin | Updated: April 5, 2017 03:57 IST

कल्याण आरटीओ कार्यालयाकडून १५ एप्रिलच्या आत रिक्षांचे २०५ नवे परवाने दिले जाणार आहेत.

अनिकेत घमंडी,डोंबिवली- कल्याण आरटीओ कार्यालयाकडून १५ एप्रिलच्या आत रिक्षांचे २०५ नवे परवाने दिले जाणार आहेत. आरटीओ हद्दीतील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा या शहरांमध्ये आधीच वाहतुकीच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. त्यातच या नवीन रिक्षांची भर पडणार असल्याने कोंडी आणखी वाढणार आहे. डोंबिवलीत अंदाजे १०० रिक्षा वाढणार असल्याने नवीन परवाने देऊ नयेत, असा पवित्रा डोंबिवलीकरांनी घेतला आहे. शहर वाहतूक नियंत्रण विभाग व कल्याण आरटीओकडे त्यांनी तशी मागणी केली आहे.डोंबिवली पूर्वेतील रामनगर आणि राजाजी पथ परिसरातील रहिवासी वाढत्या कोडींमुळे बेजार झाले आहेत. वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी त्यांनी वाहतूक विभागाकडे लावून धरली आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता त्यांनी रिक्षांच्या नवीन परवान्यांच्या वितरणाबाबत जागृती सुरू केली आहे. नवीन परवाने देऊन शहराची कोंडी आणखी वाढवू नये, वाहनतळ, पार्किंगची व्यवस्था, एकेरी मार्ग, दुचाकीचे मार्ग, अवजड वाहनांना गर्दीच्या वेळेत शहरात प्रवेशबंदी, अशा विविध नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. शहरातील कोंडीचे नियोजन महत्त्वाचे आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी रेल्वेस्थानक परिसरात होणारी कोंडी कमी व्हावी, यासाठी होमगार्ड आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे.रिक्षाचालकांमुळे कोंडी होत असल्याने त्यांना शिस्त लावणे, स्थानक परिसरातील बेकायदा रिक्षा स्टॅण्ड रद्द करून एकच मुख्य स्टॅण्ड सुरू करणे. त्यासाठी रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेणे, नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत संकेत देण्याची मागणी रामनगर आणि राजाजी पथ परिसरातील रहिवाशांनी केली आहे. कल्याण आरटीओ हद्दीत अधिकृत २० हजार रिक्षा आहेत. त्यापैकी १८ हजार सीएनजी, ५०० एलपीजी तर उर्वरित पेट्रोल आणि डिझेल धावत आहेत. बेकायदा रिक्षांचीही संख्या हजारोंच्या घरात आहे. अशा रिक्षांवर सातत्याने कारवाई करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि या बाबींवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर शहरांच्या गरजेनुसार नवीन रिक्षांना आरटीओने परवानगी द्यावी, अशी डोंबिवलीकरांची अपेक्षा आहे. पण आधीच कोंडीमुळे कंबरडे मोडलेल्या शहराला आणखी विस्कळीत का करता, असा सवाल त्यांनी केला आहे.हिंदी भाषिकांना परवाने न देण्यासंदर्भात उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेचा निकाल नुकताच लागला आहे. त्यातील कल्याण आरटीओअंतर्गत २०५ परवाने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ते १५ एप्रिलपर्यंत देण्याच्या सूचना आहेत. - नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक अधिकारी, कल्याण