शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये २०५ ठिकाणी ‘एक गाव-एक गणपती’

By admin | Updated: September 5, 2016 19:36 IST

गणरायाची प्रतिक्षा अखेर संपली असून, सोमवारी घरोघरी विघ्नहर्ता, सुखकर्ता गणरायाचे थाटात स्वागत करण्यात आले.

संतोष वानखडे, ऑनलाइन लोकमत 
 
वाशिम, दि. ५ -  गेल्या एका महिन्यांपासून आस लागून राहिलेल्या गणरायाची प्रतिक्षा अखेर संपली असून, सोमवारी घरोघरी विघ्नहर्ता, सुखकर्ता गणरायाचे थाटात स्वागत करण्यात आले. वाशिम जिल्ह्यात २०५ गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’चा उपक्रम प्रत्यक्षात साकारण्यात आला. 
 
सामाजिक एकोपा राखण्यासाठी आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनातर्फे गावक-यांना ‘एक गाव-एक गणपती’ या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले जाते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर, गावक-यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभल्याने २०५ गावांत ‘एक गाव-एक गणपती’ हा उपक्रम साकारण्यात आला. 
 
२०५ गावांमध्ये केवळ एका गणरायाची स्थापना झाली असून, येथे सर्व गावकरी मिळून विविध उपक्रम राबविणार आहेत. सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात गणरायांची स्थापना करण्याची लगबग सुरू होती. वाशिम शहरातील नगर परिषद रोडस्थित असलेल्या बाजारपेठेतून गणेशभक्तांनी गणरायांच्या आकर्षक मूर्ती घेऊन वाजत-गाजत मिरवणूक काढली.