शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मेहुण्यांकडून अतिप्रसंग झाल्यानंतर १६वर्षीय मुलीची आत्महत्या

By admin | Updated: April 6, 2017 20:38 IST

बलात्कार करणाऱ्या मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून आणि बहिणही त्यालाच पाठिशी घालत असल्याच्या कारणावरुन एका १६वर्षीय मुलीने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 6 : बलात्कार करणाऱ्या मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून आणि बहिणही त्यालाच पाठिशी घालत असल्याच्या कारणावरुन एका १६वर्षीय मुलीने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. ही खळबजनक घटना ६एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील भारतनगर येथे घडली. छाया दिलीप जाधव(१६ )असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदीराज यांनी सांगितले की, छायाच्या लहानपणीच तिची आई मृत झालेली आहे. तिच्या वडिलाने दुसरा विवाह केलेला असून तो अंबड तालुक्यातील गावी राहतात. पीडितेला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. भाऊ सातारा तांडा येथे मामाकडे तर लहान बहिण गावी वडिलासोबत राहते. विवाहित मोठी बहिण आणि मेहुणा भारतनगर येथे राहतात. तीन ते चार वर्षापासून पीडिता शिक्षणासाठी भारतनगर येथे त्यांच्याकडे राहात होती.

पीडिता वयात आल्याचे समजताच मेहुण्याची वाईट नजर तिच्यावर पडली. काही दिवसापूर्वी त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. मेहुण्याने केलेल्या या अत्याचारामुळे पीडिता प्रचंड घाबरली. रडतच तिने ही घटना तिच्या मोठ्या बहिणीला सांगितली. सख्या लहान बहिणीवर पतीने घरातच अत्याचार केला ही बाब जर पोलिसांपर्यंत गेली तर आपला संसार तुटेल, याभीतीपोटी तिने उलट छायालाच शिव्या देत मारहाण केली. लहानपणीच आईचे छत्र हरवले. आईसमान मोठ्या बहिणीनेची आपल्याला समजून न घेता मारहाण केल्याने छायाच्या मनाला खोलवर ईजा झाली. तिने याविषयी एक चिट्टी लिहिली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.

आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास छायाने गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांना घटनेची देण्यात आली. पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज, उपनिरीक्षक मिरधे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन छायाचे प्रेत घाटीत हलविले. घटनास्थळी मिळालेली चिट्टी पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी मेहुण्याला ताब्यात घेतले असून याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अशोक आव्हाड, पोलीस कर्मचारी गणेश डोईफोडे आणि मुंढे यांनी दिली. आरोपी मेहुण्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी अद्याप तक्रारदार आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.