शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आरपीआई, स्वाभिमानी शेतकारी संगठनासह महाराष्ट्रातील १६ राजकीय पक्षाची मान्यता रद्द

By admin | Updated: September 29, 2015 21:03 IST

वार्षिक लेखापरिक्षण अहवाल आणि आयकर विवरणपत्र सादर न केल्यामुळे निवडणूक आयोगाने आरपीआई, स्वाभिमानी शेतकारी संगठनासह महाराष्ट्रातील १६ राजकीय पक्षाची मान्यता रद्द केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २९निवडणूक आयोगाने आरपीआई, स्वाभिमानी शेतकारी संगठनासह महाराष्ट्रातील १६ राजकीय पक्षाची मान्यता रद्द केली आहे. वार्षिक लेखापरिक्षण अहवाल आणि आयकर विवरणपत्र सादर न केल्यामुळे मान्यता रद्द करण्यात आली आहे.निवडणुकीच्या काळात मिळालेल्या देणग्या आणि इतर खर्च याचा तपशील निवडणूक आयोगाला देण बंधनकारक आसते. पण या राजकीय पक्षांनी अद्याप तपशील दिला नसल्यामुळे निवडणूक आयोगाने आक्रमक पवित्रा घेत, राजकीय पक्षांना नोटिसा धाडल्या होत्या. या नोटीसला राजकीय पक्षांनी दिलेलं उत्तर समाधानकार नाही. त्यामुळे निवडणूक आयोग १६ राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे या पक्षांना एकत्रित निवडणूक चिन्ह मिळणार नाही, असे राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात राजकीय पक्षांना न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.या पक्षांमध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचाही समावेश आहे. इतकंच नाही, तर आमदार कपिल पाटील यांचा लोकभारती पक्ष आणि माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्षाचाही या यादीत समावेश आहे.खालील राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना< रामदास आठवले यांचा रिपाई< कपिल पाटील यांचा लोकभारती< विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती< ऑल इंडिया क्रांतीकारी काँग्रेस< भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष< इंडियन मुस्लिम काँग्रेस पार्टी< मागासवर्गीय जनशक्ती पार्टी< राष्ट्रवादी जनता पार्टी< प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी< सत्यशोधक समाज पक्ष< शिवराज्य पक्ष,< रिपाई(डेमोक्रॅटिक),< महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस,< रिपब्लिकन पक्ष (खोरीपा),< जनशक्ती आघाडी पेण