शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यासाठी १६ कोटीचे ४५४ सीसीटीव्ही

By admin | Updated: April 7, 2015 04:33 IST

दोन महिन्यावर आलेल्या नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबतचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

जमीर काझी, मुंबईदोन महिन्यावर आलेल्या नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबतचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.नाशिक व त्र्यंबकेश्वरातील १६७ महत्वाची ठिकाणी निश्चित करण्यात आलेली असून या ठिकाणी ४५४ कॅमेरे बसविले जाणार आहेत. कुंभमेळ्याच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर बसविण्यात येणा-या या विशेष कॅमेऱ्यासाठी १६ कोटी ८ लाखावर निधी खर्च करण्याला गृहविभागाने हिरवा कंदील दिला आहे. आवश्यकतेनुसार याठिकाणी टप्याटप्याने कॅमेऱ्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कुंभमेळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक शस्त्रसामग्रीसाठी केंद्र व राज्यसरकारने कोट्यवधीच्या निधीची तरतूद केलेली आहे.त्यानुसार खरेदी व तांत्रिक समितीने मंजुर केलेल्या निविदेला गृह विभागाकडून नुकतीच मंजूरी देण्यात आली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये १५२ ठिकाणी २७४ तर त्रंबकेश्वरमध्ये ५५ ठिकाणी १८० कॅमेरे बसविले जाणार असून येत्या पंधरवड्यात त्याबाबतची कार्यवाही सुरु केली जाणार आहे. दर बारा वर्षांनी गोदावरी नदीच्या काठी भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून विविध आखाड्यातील हजारो संत-साधूंचे आगमण होणार आहे. वर्षभर चालणाऱ्या या सोहळ्यात सहभागी भाविकांची संख्या काही लाखांमध्ये असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी विशेष दक्षता बाळगली जात आहे.सुरक्षेच्यादृष्टिने कोणतीही त्रुटी न रहाण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून वरिष्ट अधिकाऱ्यांनी त्याबाबत घटनास्थळी भेट नियोजन केले जात आहे. नाशिकमध्ये १५२ ठिकाणी २७४ कॅमेरे बसविण्यासाठी सुरवातीला शासनाने ७.११ कोटीचा निधी निश्चित केला होता. मात्र निविदा प्रकियेमध्ये त्यासाठी उत्तम दर्जाचे व न्यूनत्तम दराने अतिरिक्त ४ कोटी ८७ लाख, ३२ हजार४४३ रक्कमेची आवश्यकता होती.त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वरमधील ५५ ठिकाणी १८० कॅमेरे आणि कायमस्वरुपी कंट्रोलरुम बांधण्यासाठी ३.३५ कोटीची निधीची तरतूद केली होती. मात्र त्यासाठी आणखी ७५ लाख, २९ हजार६८० रुपयांची गरज लागणार असल्याचे टेंडरमधून स्पष्ट झाले.त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या वाढीव निधीसाठी खरेदी समितीने नव्याने प्रस्ताव बनविला होता.त्याला वित्त विभागाची मंजूरी मिळाल्यानंतर गृह विभागाने त्याबाबतचे आदेश बजाविलेले आहेत. त्यानूसार या दोन्ही शहरामध्ये एकुण ४५४ कॅमेरे बसविले जातील. त्यासाठी एकुण १६ कोटी ८ लाख ६२ हजार १२३ खर्च येणार आहे. कुंभमेळा संपल्यानंतर कंपनीला हे कॅमेरे परत केले जाणार आहेत.