140 number massage was fake says maharashtra cyber | सोशल मीडियावर व्हायरल होणारा 140 नंबरबाबतचा 'तो' मेसेज म्हणजे अफवा

सोशल मीडियावर व्हायरल होणारा 140 नंबरबाबतचा 'तो' मेसेज म्हणजे अफवा

मुंबई - सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून अनेक मेसेज हे व्हायरल होत असतात. सध्या 140 या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसीव्ह केला तर आपल्या खात्यातील सर्व रक्कम काढली जाते असा मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. मात्र या व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं  महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केलं आहे. जोपर्यंत बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा  क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड चे पूर्ण नंबर तसेच  सी.व्ही.व्ही./ पिन नंबर  शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नसल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगितलं आहे. 

जर  140 ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून फोन कॉल आला तर घाबरू नये/ पॅनिक होऊ नये. हे क्रमांक टेलिमार्केटिंग करिता दिले गेलेले असतात.  परंतु हे देखील लक्षात ठेवावे की, अशा किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून फोन कॉल आल्यास व ओटीपीसह आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, डेबिट/ क्रेडिट  कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल  तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट/ क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका किंवा पिन नंबर/ ओटीपीची माहिती त्यांना दिली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कौतुकास्पद! ...अन् तिच्यासाठी डॉक्टर झाला गायक, Video पाहून तुम्हीही कराल सलाम

CoronaVirus News : धडकी भरवणारी आकडेवारी! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ

"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली" - शरद पवार

CoronaVirus News : चिंताजनक! "2021च्या आधी Corona Vaccine शक्य नाही"

CoronaVirus News : सलाम! ...म्हणून ड्युटी संपल्यावर खास कोरोनाग्रस्तांसाठी नर्स वाजवते वायोलिन

English summary :
140 number massage was fake says maharashtra cyber

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 140 number massage was fake says maharashtra cyber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.