शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वळवावळवीचा 100 वर्षांचा इतिहास

By admin | Updated: September 19, 2015 21:32 IST

ममहाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या नागरीकरणातून शहरी भागाची पाण्याची गरज असा नवा संघर्ष उभा राहण्याची दाट शक्यता नजीकच्या काळात आहे.

- वसंत भोसले (लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत.)महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या नागरीकरणातून शहरी भागाची पाण्याची गरज असा नवा संघर्ष उभा राहण्याची दाट शक्यता नजीकच्या काळात आहे. कृष्णा किंवा गोदावरी खोऱ्यातील किंवा कावेरीचा पाणी तंटा आदी वादाने आंतरराज्य प्रश्न खूपच गाजले आहेत. आता ते खालपर्यंत येऊ पाहत आहेत. पूर्व वाहिन्या नद्यांच्या खोऱ्यातील पाणी पश्चिमेकडे वळविण्यात आले. त्याला आता १०० वर्षे होऊन गेली. १९११पासून त्याची सुरुवात झाली आणि आता पश्चिमेकडे वळविलेले पाणी मुंबई परिसरातील महानगरांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी वळविता येईल का? याचा विचार चालू झाला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी अडवून कोकणाच्या तळाशी बसविण्यात आलेल्या वीज उत्पादन केंद्रातून वीज तयार करायची अशी पहिली योजना १९११मध्ये सुरू झाली. टाटा पॉवरने हा यशस्वी प्रयोग केला. तत्पूर्वी, कोयनेचे सर्वेक्षण करण्यात आले होते, पण कोयनेच्या खोऱ्याचा विस्तार मोठा आणि प्रचंड पाणी असल्याने आर्थिक भार पेलवणे शक्य नव्हते. त्यामुळे टाटा पॉवरने पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि लोणावळ्याजवळ इंद्रायणी नदीवर धरणे बांधली. त्याचे पाणी पूर्व वाहिनी होते. ते पश्चिमेकडे वळवून अनुक्रमे भिरा आणि खोपोली (जि. रायगड) येथे वीजनिर्मिती केंद्रे उभारली. स्वातंत्र्योत्तर काळात कोयनेवर ९८ टीएमसीचे धरण बांधण्यात आले. त्यापैकी ६७.५ टीएमसी पाणी पश्चिमेकडे कोयनेत वळविण्यात आले. त्यातून आता २००० मेगावॅट विजेचे उत्पादन केले जात आहे. या धरणाची साठवण क्षमता वाढवून १०८ टीएमसी पाणी अडविले जाते. त्यापैकी ७५ टीएमसी पाणी पश्चिमेकडे विजेसाठी वळविले जाते. कोयना, मुळशी व खोपोली असे सुमारे १२५ टीएमसी पाणी वापरून खाली सोडण्यात येते.एका बाजूने वाहणारे पाणी दुसरीकडे वळविण्याचे हे मोठे प्रयोग झाले आहेत. त्यापैकी कोयनेचे पाणी वाया जात आहे आणि पूर्वेकडील पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि कर्नाटकचा मोठा प्रदेश कायमस्वरूपी अवर्षणाच्या खाईत आहे. आता विजेची मागणी पूर्ण करायची की, शेती, पिण्याचे तसेच इतर उपयोगाचे पाणी म्हणून हे पूर्ववत पूर्वेकडे सोडायचे हा चर्चेचा विषय होऊ शकतो. मुंबईला पाण्याची वाढती मागणी आहे. ती मागणी पूर्ण करावीच लागेल, पण पाणी वळवून द्यायचे का, हा सवाल उपस्थित होतो.कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविण्यास हरकत नाही, पण कोयनेच्या विजेचा ताण कमी केला तर मुंबईकडे पाणी वळवूनही पूर्वेकडील दुष्काळग्रस्त भागाला अधिक देता येईल, असे दुहेरी नियोजन करण्याची गरज आहे. पाणी वळवावळणीच्या इतिहासावरून काही शिकण्यासारखे आहे, अन्यथा पाण्यासाठी मोठे संघर्ष उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. - भिरा आणि खोपोली (जि. रायगड) येथे वीजनिर्मिती केंद्रे उभारली. त्यातून सुमारे ४०० मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे.- २००० मेगावॅट विजेचे उत्पादन सध्या कोयनेच्या धरणात केले जात आहे.- केंद्र सरकारने कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविण्याच्या प्रस्तावास नुकतीच तत्त्वत: मान्यता दिली आहे. तो प्रकल्प पूर्ण झाल्यास कोयनेचे पाणी कायमस्वरूपी पश्चिमेकडेच द्यावे लागेल. मात्र, पूर्वेकडील वाढती गरजही दुर्लक्षून चालणार नाही. कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविण्यास हरकत नाही, पण कोयनेच्या विजेचा ताण कमी केला तर मुंबईकडे पाणी वळवूनही पूर्वेकडील दुष्काळग्रस्त भागाला अधिक देता येईल, असे नियोजन हवे. - पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पाणी वळविण्याचे प्रकल्प हिताचे नाहीत, पाण्याची उपलब्धता पाहून विकासाचे नियोजन व्हायला हवे.- एका बाजूने वाहणारे पाणी दुसरीकडे वळविण्याचे हे मोठे प्रयोग झाले आहेत. त्यापैकी कोयनेचे पाणी वाया जात आहे आणि पूर्वेकडील पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि कर्नाटकचा मोठा प्रदेश कायमस्वरूपी अवर्षणाच्या खाईत आहे.