'काँग्रेसचे नेते आपल्या मुलांना सेट करण्याच्या नादात, MP ला अपसेट करतायत'; पंतप्रधान मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 05:13 PM2023-11-05T17:13:33+5:302023-11-05T17:13:56+5:30

"2014 पूर्वी काँग्रेसच्या काळात लाखो-करोडो रुपयांचे घोटाळे व्हायचे अन् आता..."

'Congress leaders upset Madhya Pradesh by trying to setting up their children'; Prime Minister Modi's attack in seoni and khandwa rally | 'काँग्रेसचे नेते आपल्या मुलांना सेट करण्याच्या नादात, MP ला अपसेट करतायत'; पंतप्रधान मोदींचा घणाघात

'काँग्रेसचे नेते आपल्या मुलांना सेट करण्याच्या नादात, MP ला अपसेट करतायत'; पंतप्रधान मोदींचा घणाघात

भोपाल - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होत. येथील सिवनी येथे त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी, मध्य प्रदेशला सातत्याने विकास आणि सुशासनाची आवश्यकता आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेस आणि कमलनाथ यांच्यावर जोर दार निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचाकाँग्रेसवेर जोरदार निशाणा - 
काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "2014 पूर्वी काँग्रेसच्या काळात लाखो-करोडो रुपयांचे घोटाळे व्हायचे. आता भाजप सरकारमध्ये घोटाळे होत नाहीत. गरीबांच्या हक्काचा जो  पैसा आम्ही वाचवला आहे, तो आता गरीबांच्या रेशनवर खर्च होत आहे. घोटाळेबाज काँग्रेस सरकार आणि भाजप सरकारमध्ये हाच मोठा फारक आहे."

मोदी म्हणाले, "मध्य प्रदेशात काँग्रेस निवडणूक लढत नाही. तर ते, कुणाचा मुलगा काँग्रेसचा 'मुखिया' बनेल? यासाठी निवडणूक लढत आहेत. येथील काँग्रेसचे नेते आपल्या मुलांना सेट करण्याच्या कामात लागले आहेत. यात ते एवढे व्यस्त झाले आहेत की, त्यांना जनतेचाही विसर पडला आहे. हे बडे नेते आपल्या मुलांना सेट करण्याच्या नादात मध्य प्रदेशला अपसेट करत आहेत."

फर्स्ट टाइम व्होटर्सना पंतप्रधान मोदींचं आवाहन -
मोदी म्हणाले, हे डबल इंजिन सरकार माता आणि भगिनींना समर्पित आहे. यांना त्रास होऊ नये यासाठी आपण शौचालय बांधले, सिलिंडर दिले, वीज दिली आणि आता हर घर जल योजनेच्या कामात लागले आहे. यावेळी फर्स्ट टाइम व्होटर्सना आवाहन करताना मोदी म्हणाले, "एमपीला टॉप राज्य बनविण्यासाठी एकत्रितपणे काम करू आणि पुन्हा एकदा कमळ फुलवू. घरो-घरो जाऊन लोकांना सर्व काही सांगू आणि प्रत्येक बूथवर कमळ फुलवू"
 

Web Title: 'Congress leaders upset Madhya Pradesh by trying to setting up their children'; Prime Minister Modi's attack in seoni and khandwa rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.