'राहुल गांधी तोंड दाखवू शकत नाहीत, म्हणूनच बहिणीला पाठवलं', अनुराग ठाकूरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 02:32 PM2023-06-12T14:32:47+5:302023-06-12T14:52:21+5:30

प्रियंका गांधी यांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावरुन अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर घणाघात.

Anurag Thakur on Congress: 'Rahul Gandhi can't show his face, that's why he sent his sister', criticizes Anurag Thakur | 'राहुल गांधी तोंड दाखवू शकत नाहीत, म्हणूनच बहिणीला पाठवलं', अनुराग ठाकूरांची टीका

'राहुल गांधी तोंड दाखवू शकत नाहीत, म्हणूनच बहिणीला पाठवलं', अनुराग ठाकूरांची टीका

googlenewsNext

Anurag Thakur Attacks on Congress:काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरुन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'राहुल गांधी यांनी 2018 मध्ये मध्य प्रदेशात दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. राहुल गांधी मध्य प्रदेशात तोंड दाखवू शकत नाहीत, म्हणुनच आता त्यांनी त्यांच्या बहिणीला पाठवले आहे,' अशी टीका अनुराग ठाकूर यांनी केली.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीबद्दल म्हणाले- 'ममता बॅनर्जीचे लोक बंगाल पेटवत आहेत. बंगालच्या पंचायत निवडणुकीत हिंसाचार होत असून राज्याची ठिकाणची ओळख हिंसाचार आणि भ्रष्टाचार अशी झाली आहे. ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये आणि लालू यादव यांच्या काळात पैसे देऊन नोकरी मिळायची. तमिळनाडूतील जवान आपल्या पत्नीच्या सुरक्षेसाठी याचना करतो, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना अनुराग ठाकूर म्हणाले की, 'पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. पंतप्रधानांनी यशस्वी सरकार दिले आहे. हिमाचल प्रदेशात 6 महिन्यांपूर्वी काँग्रेसने शेण 2 रुपये किलो, दूध 100 रुपये किलो, 300 युनिट वीज मोफत आणि 1500 रुपये महिलांच्या खात्यात जातील, असे सांगितले होते. महिलांच्या खात्यात 1500 रुपये आले? शेण 2 रुपये किलो झाले का? दूध 100 रुपये किलो झाले? तुमचे वीज बिल माफ झाले? शेण जपून ठेवा, काँग्रेसवाले आल्यावर काय करायचं, हे तुम्हाला माहित आहेच,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

प्रियंका गांधींची टीका
जबलपूरमध्ये शिवराज सरकारवर हल्लाबोल करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, मोदींच्या शिव्यांची यादी भाजपच्या घोटाळ्यांच्या यादीपेक्षा मोठी आहे. त्यांनी नर्मदा नदीलाही सोडले नाही. त्यांनी 225 महिन्यांत 220 घोटाळे केले आहेत. ते 18 वर्षांपासून सत्तेत आहेत. कोणी एवढी वर्षे सत्तेत राहिल्यावर आळशी होतो. सरकार तीन वर्षांत केवळ 21 नोकऱ्या देत आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पेपर लीक होत आहेत. मुलांचे शिक्षण, पालकांचे पैसे वाया जात आहेत. नोकरी मिळू शकत नाही. तरुण नाराज असून पदे रिक्त आहेत. आदिवासींची अवस्था बिकट झाली आहे, अशी टीका प्रियंका गांधींनी केली.

Web Title: Anurag Thakur on Congress: 'Rahul Gandhi can't show his face, that's why he sent his sister', criticizes Anurag Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.