शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

नीट प्रकरण! चकवा देणाऱ्या इरण्णाची गाडी काेणत्या महामार्गावर सुसाट? तपास यंत्रणांचा माग  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 08:53 IST

टाेल नाक्यावरील ‘सीसीटीव्ही’ची पाहणी...

लोकमत न्यूज नेटवर्क, लातूर : नीट गुणवाढीसंदर्भात लातुरात गुन्हा दाखल हाेण्याची कुणकुण लागताच इरण्णा काेनगलवारने काही वेळातच पाेलिसांना ‘चकवा’ देत लातूर साेडल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती आली आहे. त्याची गाडी काेणत्या महामार्गावरून सुसाट धावली याचा शाेध घेतला जात आहे. यासाठी लातूर, नांदेड, धाराशिव आणि साेलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर असलेल्या टाेल नाक्यावरील ‘सीसीटीव्हीं’च्या फुटेजची पाहणी केली जात आहेत. दिल्लीतील गंगाधर आणि लातुरात वास्तव्याला असलेल्या इरण्णाच्या शाेधार्थ तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्या अटकेसाठी पथके उत्तराखंड, झारखंड व दिल्लीच्या दिशेने रवाना झाली आहेत. 

कोणत्या मार्गाने झाला पसार?नांदेड येथील ‘एटीएस’ने लातुरात दिवसभर छापसत्र सुरू केल्यानंतर मुख्याध्यापक पठाण आणि शिक्षक जाधवला चाैकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच इरण्णा ‘एटीएस’ला चकवा देत निसटला. लातूर साेडताना त्याने काेणत्या मार्गावरून प्रवास केला? याचा माग पाेलिस काढत आहेत. यासाठी लातूरसह शेजारच्या जिल्ह्यातील महामार्गावरील टाेल नाक्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे. यातूनच इरण्णाची गाडी काेणत्या महामार्गावरून सुसाट निसटली हे समाेर येणार आहे.

लातूरमधील आराेपींचे कनेक्शन हैदराबादमार्गे दिल्ली - नीट प्रकरणातील आराेपींची साखळी हैदराबादमार्गे दिल्लीपर्यंत पाेहोचली असल्याचे पाेलिस तपासात समाेर आले आहे. आराेपी एकमेकांशी कसे भटले, त्यांच्या कामकाजाची पद्धती कशी हाेती, याबाबत मंगळवारी घेतलेल्या जबाबातून काही खुलासे झाले आहेत. - आराेपी जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण आणि शिक्षक संजय जाधव हे दाेघेही उमरगा येथील आयटीआयमध्ये कार्यरत असलेला इरण्णा काेनगलवार याच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची भेट लातुरात झाली. इरण्णा उमरग्याला नाेकरी असली तरी वास्तव्याला लातुरात हाेता. - पठाण, जाधव यांच्याकडून मिळालेली प्रवेशपत्रे इरण्णा दिल्लीला पाठवत. दिल्लीतील आराेपी गंगाधर हा हैदराबादमध्ये आला. त्याला भेटण्यासाठी लातूर येथून इरण्णा गेला हाेता, अशी माहिती पाेलिस चाैकशीत  आराेपी शिक्षक संजय जाधव याने मंगळवारी दिली.- पठाण, जाधव हे दाेघेही लातुरात राहूनच काम करत हाेते, तर दिल्लीच्या गंगाधरशी मध्यस्थ म्हणून इरण्णाची जबाबदारी हाेती. आता इरण्णा आणि गंगाधर ताब्यात आल्यानंतरच नीट गुणवाढीचे पुढे काय कनेक्शन आहे हे स्पष्ट हाेणार आहे.

टॅग्स :laturलातूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र