शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर तालुक्यात बुधवारी दिवसभर भिज पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

विनायक चाकुरे उदगीर : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्‍यातील सर्वच भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी ...

विनायक चाकुरे

उदगीर : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्‍यातील सर्वच भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी काही दिवस खंड पडल्यानंतर जुलै महिन्यापासून तालुक्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने खरिपाच्या पिकाची परिस्थिती सुधारली आहे. त्यातच बुधवारी तालुक्यात सर्वत्र दिवसभर भिज पाऊस होता. हा पाऊस काही भागात पिकाला पोषक आहे तर काही भागातील शेतात पाणी साचण्याची शक्यता शेतकऱ्याकडून वर्तवली जात आहे. सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने फवारणी करणे गरजेचे बनले आहे.

मागील काही दिवसांपासून तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरिपाची पिके सावरली आहेत. विशेषत: सोयाबीनचे पीक चांगलेच बहरले असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. तालुक्यातील काही मंडळ जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी,नाल्याला पूर आला होता. त्यातच बुधवारी दिवसभर उदगीर शहर व तालुक्यात सर्वच भागात दिवसभर भिज पाऊस होता. तालुक्यातील अनेक भागातील सोयाबीनवर शेतकरी किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणीच्या कामाला लागले आहेत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरिपाची सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी या पिकाची वाढ चांगली होत आहे. मागील वर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसून सोयाबीन मोठ्या प्रमाणात डागी होऊन त्यामुळे योग्य दर मिळाला नव्हता. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा सोयाबीनच्या उत्पादनात झालेली घट व तेलाला असलेली मागणी त्यामुळे यावर्षी सोयाबीनला मागील काही दिवसांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा यंदा सोयाबीनवर अवलंबून आहेत.

उदगीर मंडळात सर्वाधिक पाऊस..

उदगीर ५३६ मि.मी. नागलगाव ४२१, मोघा ४३४, हेर ३६३, वाढवणा ५०६, नळगीर ५८९, देवर्जन ३६८ तर तोंडार महसूल मंडळात ३१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे मशागतीच्या कामांना अडचण...

किनी यलादेवी भागात चांगला पाऊस झाल्यामुळे पिकाची परिस्थिती उत्तम असून, मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे अंतर्गत मशागतीच्या कामाला अडचण निर्माण झाली आहे. या भागातील तळे, विहिरी भरल्या असून, मागील काही वर्षापासून आषाढी एकादशीपूर्वी तळे व विहिरी भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. -ज्ञानेश्वर नारगुडे, शेतकरी, किनी यलादेवी.