शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

सत्ताबदलाचा भाजपला दणका; बहुमत असतानाही लातूरमध्ये कॉंग्रेसचा महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:33 PM

मनपात काँग्रेस 33, भाजप 35 व अन्य 1 असे पक्षीय बलाबल आहे.

ठळक मुद्देमनपात बहुमत असलेल्या  भाजपा महापौर पदाचा उमेदवार पराभूत

लातूर : लातूरच्या महापौरपदी काँगेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपचे शैलेश गोजमगुंडे यांचा 35 विरुद्ध 33 मतांनी पराभव केला. तर उपमहापौरपदी भाजपचे बंडखोर चंद्रकांत बिराजदार यांनी काँग्रेसच्या पाठींब्यावर विजय मिळविला. भाजपच्या दोन नगरसेवकांनी काँगेसला मतदान केल्याने सत्ताधारी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली. महापौर निवडणुकीत काँगेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपचे शैलेश गोजमगुंडे यांचा 35 विरुद्ध 33 मतांनी पराभव केला.  भाजपच्या दोन व अन्य एक  नगरसेवकाने काँगेसला मतदान केल्याने सत्ताधारी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.तर उपमहापौर पदाची निवडणूक भाजपच्या भाग्यश्री कौळखरे व भाजपचेच बंडखोर चंद्रकांत बिराजदार यांच्यात झाली. यात भाजपचे बंडखोर चंद्रकांत  बिराजदार यांनी काँग्रेसच्या पाठींब्यावर 32 विरुद्ध 35 मतांनी विजय संपादन केला.अडीच वर्षातच महापालिकेत सत्तांतर झाले.

मनपात काँग्रेस 33, भाजप 35 व अन्य 1 असे पक्षीय बलाबल आहे. बैठकीस काँगेसचा एक सदस्य अनुपस्थित असून भाजपच्या एका सदस्याचे निधन झाले आहे. त्यामुळे  महापौर पदाच्या निवडणुकीसाठी 68 सदस्य उपस्थित होते. हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात 68 पैकी 35 मते काँगेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना मिळाली आहेत. तर उपमहापौर निवड बैठकीत 68 पैकी भाजपच्या  नागरसेविका शकुंतला गाडेकर अनुपस्थित राहिल्या. दरम्यान भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षाकडून व्हीप बजावण्यात आला होता.  व्हीप डावलून काँगेसला मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर पक्ष काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. निवडीनंतर काँगेस कार्यर्त्यांनी मनपा कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी केली.

टॅग्स :laturलातूरcongressकाँग्रेसBJPभाजपा