उदगीरमध्ये चोरट्यांनी १४ लाख ८२ हजारांसह एटीएम मशीन पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST2021-05-03T04:14:36+5:302021-05-03T04:14:36+5:30

पाेलिसांनी सांगितले, उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावरील रघुकुल मंगल कार्यालयाजवळील दायमी कॉम्प्लेक्स येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. ...

In Udgir, thieves stole ATM machines worth Rs 14.82 lakh | उदगीरमध्ये चोरट्यांनी १४ लाख ८२ हजारांसह एटीएम मशीन पळविली

उदगीरमध्ये चोरट्यांनी १४ लाख ८२ हजारांसह एटीएम मशीन पळविली

पाेलिसांनी सांगितले, उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावरील रघुकुल मंगल कार्यालयाजवळील दायमी कॉम्प्लेक्स येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास तिथे वॉचमन नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी संपूर्ण मशीन उचलून नेले. तद्नंतर उदगीरनजीकच्या शेल्हाळ शिवारात मशीनचा वरचा भाग पडल्याची माहिती मिळाली. त्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदरील एटीएम मशीनमधील १४ लाख ८२ हजारांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी मशीन फोडून नेल्याची फिर्याद गणेश कानुरे यांनी दिल्याने उदगीरच्या शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एडके हे करीत आहेत.

फोटो : ०२एलएचपी०१ उदगीरात चोरट्यांनी एटीएम मशीन पळविल्याने दिसत असलेली रिकामी जागा.

०२एलएचपी ०२ उदगीरनजीकच्या शेल्हाळ शिवारात एटीएम मशीनचा वरील भाग सापडल्याने पाेलीस कर्मचारी पंचनामा करीत असताना.

Web Title: In Udgir, thieves stole ATM machines worth Rs 14.82 lakh