शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

भांडणाची कुरापत काढून दोघा विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST

पोलिसांनी सांगितले, चापोली येथील एका महाविद्यालयातील वर्गात शनिवारी दुपारी फिर्यादी बालाजी तुकाराम श्रीमंगले (१८) व साक्षीदार राम कोरे (दोघेही ...

पोलिसांनी सांगितले, चापोली येथील एका महाविद्यालयातील वर्गात शनिवारी दुपारी फिर्यादी बालाजी तुकाराम श्रीमंगले (१८) व साक्षीदार राम कोरे (दोघेही रा. अजंनसोंडा, बु.) हे १२ वीची परीक्षा देऊन बोलत बसले होते. तेव्हा आरोपी नामदेव गोरखनाथ बोईनवाड याच्यासह अन्य काहीजण गैरकायद्याने एकत्र येऊन वर्गात प्रवेश केला. सहा महिन्यांपूर्वी माझे व माझ्या मित्राचे नाव सांगून गावातील लोकांकडून मार खाऊ घातला, असे म्हणत मागील भांडणाची कुरापत काढली. दरम्यान, बालाजी श्रीमंगले यास शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात करण्यात आली. तेव्हा राम कोरे हा भांडण सोडवत असताना नामदेव बोईनवाड याने श्रीमंगलेचे पोट, हात, दंड, मनगटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तसेच इतर आरोपींनी श्रीमंगले व कोरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोरे हा भांडण सोडवत असताना त्याच्यावरही चाकूने वार करून जखमी करण्यात आले.

याबाबत बालाजी श्रीमंगले यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात आरोपी नामदेव गोरखनाथ बोईनवाड, विशाल अशोक पवार व अन्य चौघांवर (सर्व रा. चापोली) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एस. सूर्यवंशी, पोहेकॉ परमेश्वर राख हे करीत आहेत. गंभीर जखमी असलेल्या बालाजी बोईनवाडवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.