रिक्षावर झाड कोसळून झाला चक्काचूर; चालकाचा मृत्यू तर एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 16:12 IST2021-07-22T16:11:52+5:302021-07-22T16:12:33+5:30
The tree fall on the rickshaw : रिक्षात एक जण होता, तोही किरकोळ जखमी आहे. त्याची माहिती पोलिस घेत आहेत.

रिक्षावर झाड कोसळून झाला चक्काचूर; चालकाचा मृत्यू तर एकजण जखमी
लातूर : लातूर शहरात उषाकिरण टॉकीज समोरच्या परिसरात थांबलेला ऑटोरिक्षा क्रमांक एम.एच. २४ ए.बी. ३१६८ वर गुरूवारी दुपारी एक झाड कोसळले. त्यात रिक्षाचालक मारोती सिद्राम काळे रा. चांडेश्वर (वय ४८ )यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहर व परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. दरम्यान हिरवे झाड कसे काय कोसळले याचा शोध घेतला जात आहे. रिक्षात एक जण होता, तोही किरकोळ जखमी आहे. त्याची माहिती पोलिस घेत आहेत.