पावणेतीन लाखाच्या दारूसह टेम्पो जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST2021-09-24T04:23:31+5:302021-09-24T04:23:31+5:30

वलांडी पोलीस चौकीच्या हद्दीतील उदगीर - निलंगा राज्यमार्गावरील धनेगाव येथे अवैधरित्या देशी व विदेशी दारू टेम्पोतून नेण्यात येत असल्याची ...

Tempo confiscated with Rs 53 lakh worth of liquor | पावणेतीन लाखाच्या दारूसह टेम्पो जप्त

पावणेतीन लाखाच्या दारूसह टेम्पो जप्त

वलांडी पोलीस चौकीच्या हद्दीतील उदगीर - निलंगा राज्यमार्गावरील धनेगाव येथे अवैधरित्या देशी व विदेशी दारू टेम्पोतून नेण्यात येत असल्याची माहिती वलांडी पोलीस चौकीचे सपोनि पंकज शिनगारे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी पथक नियुक्त करून बुधवारी रात्री सापळा रचला. यावेळी टेम्पो अडवून विदेशी दारूचे ७ बॉक्स व देशी दारूचे ८५ बॉक्स दारू जप्त करण्यात आली. तिची किंमत २ लाख ८९ हजार २० रुपये असून टेम्पोसह एकूण ६ लाख ८९ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात सपोनि पंकज शिनगारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर अशोक मोरखडे (रा. भालकेवाडी, ता. निलंगा) व सुभाष रघुनाथ माने (रा. निटूर, ता. निलंगा) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. पंकज शिनगारे, एएसआय नारायण डपडवाड, पोहेकॉ. विनायक कांबळे यांनी केली.

Web Title: Tempo confiscated with Rs 53 lakh worth of liquor