शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना लसीकरणात तगरखेडा जिल्ह्यातील ठरले अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST

जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्या सूचनेनुसार, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत कोरोना लसीकरण करण्यासाठी वेग वाढविण्यात आला आहे. त्यानुसार, गावागावांत ...

जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्या सूचनेनुसार, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत कोरोना लसीकरण करण्यासाठी वेग वाढविण्यात आला आहे. त्यानुसार, गावागावांत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तगरखेडा येथील सरपंच केवळाबाई सूर्यवंशी, उपसरपंच मदन बिरादार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी गावात आपापल्या प्रभागामध्ये जनजागृती करत, नागरिकांना लसीकरण करण्यासाठी आवाहन केले. काही ग्रामस्थांनी त्यांच्या घरी जाऊन लसीकरणाबद्दल जनजागृती केली. औराद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.वैभव कांबळे, तगरखेडा उपकेंद्राच्या डाॅ.सविता भारती, समशाद मुल्ला आणि त्यांच्या पथकाने पुढाकार घेत, गावात जास्तीतजास्त लसीकरणासाठी शिबिर घेतले. गावात ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती मोहीम राबवत जास्तीतजास्त लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले हाेते. सर्व गावकऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीला यश आले. गटविकास अधिकारी अमाेल ताकभाते, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रदीपकुमार जाधव, आरोग्य विभाग सतत जास्तीतजास्त लसीकरणासाठी प्रयत्नशील राहिले, तसेच काही नागरिकांना घरी जाऊन लस देण्यात आली. तगरखेडा गावाची एकूण लोकसंख्या ३ हजार ३४० आहे. गावातील १८ वर्षांवरील लोकसंख्या २ हजार २५५ आणि १०० टक्के लसीकरण झालेली संख्या २ हजार ३५३ आहे

या उपक्रमातील लसीकरण केंद्राला पंचायत समिती उपसभापती अंजली पाटील यांनी भेट दिली. यावेळी सरपंच केवळाबाई सूर्यवंशी, उपसरपंच मदन बिराजदार, औराद भाजप अध्यक्ष राजा पाटील, ग्रामविकास अधिकारी एस.एच. गिरी, डाॅ.सविता भारती, रणजीत सूर्यवंशी, ग्रा.पं. सदस्य सुभाष डावरगावे, सुरेश थेटे यांची उपस्थिती हाेती.