शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतुकीतून ‘एस.टी.’ ने केली पावणेदोन कोटींची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST

गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गास आळा घालण्यासाठी लाॅकडाऊन‌ लागू करण्यात आला होता. या काळात एस.टी.ची तब्बल दोन महिने प्रवासी वाहतूक ...

गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गास आळा घालण्यासाठी लाॅकडाऊन‌ लागू करण्यात आला होता. या काळात एस.टी.ची तब्बल दोन महिने प्रवासी वाहतूक सेवा ठप्प होती. परिणामी एस.टी.चे उत्पन्न थांबलेले होते. उत्पन्न वाढविण्यासाठी एस.टी.ने मे महिन्यापासून मालवाहतूक सेवेला सुरुवात केली. शेतकरी, व्यापाऱ्यांचा प्रतिसाद पाहता ट्रकची संख्या वाढवून २२ करण्यात आली. मे २०२० ते मार्च २०२१ या अकरा महिन्यांच्या कालावधीत मालवाहतुकीच्या माध्यमातून एस.टी. महामंडळाच्या लातूर विभागाला १ कोटी ८१ लाख ६६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सदरील २२ मालवाहतूक ट्रकने ४ लाख ४१ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. परिणामी, कोरोनाकाळात होत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी महत्त्वाचा हातभार लागला आहे. ट्रकमधून जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी अशा धान्याची वाहतूक केली जात आहे. त्याचबरोबर किराणामाल, पशुखाद्य, बियाणे, सिमेंटची वाहतूक केली जात आहे. जिल्ह्यात शेतकरी सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असतात. शेतकऱ्यांनी एसटीकडे ट्रकची मागणी केल्यानंतर ट्रक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहे. माल भरल्यानंतर सुरक्षित थेट ऑईल मिलवर पोहोचविला जात आहे. मालवाहतूक ट्रकसाठी महामंडळाने दिलेला दर हा अन्य मालवाहतुकीपेक्षा कमी आहे. एखादा शेतकरीही त्याच्याकडे जास्त शेतमाल असेल तर त्यासाठी या ट्रकचा उपयोग करू शकतो. त्यामुळे शेतकरी, व्यापारी सेवेचा लाभ घेत आहेत.

लातूर विभागात २२ ट्रकद्वारे मालवाहतूक...

राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात सध्या २२ मालवाहतूक ट्रक आहेत. यामध्ये लातूर आगारात १६, उदगीर ४ तर अहमदपूर येथील २ ट्रकचा समावेश आहे. दरम्यान, या उपक्रमातंर्गत आतापर्यंत ४ लाख ४१ हजार किलोमीटरचा प्रवास मालवाहतूक ट्रकने केला आहे. व्यापारी, शेतकरी, उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर जिल्ह्यांतही मालवाहतूक केली जात आहे. त्यामुळे अकरा महिन्यांच्या कालावधीत एस.टी. महामंडळाला १ कोटी ८१ लाख ६६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचे लातूर विभागाचे अभय देशमुख यांनी सांगितले.